ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी ..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/02/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी .....

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी .....
        चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक, शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
         कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल, समन्वयक अश्विनी पाटील, दीप्ती पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का पाटील आणि आर्या  सोनवणे या विद्यार्थिनींनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी " जय जय महाराष्ट्र माझा " ..... या गीताचे सामुदायिक गीत गायन केले. शाळेतील शिक्षिका कामिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची माहिती सांगितली.
         अंशिका पाटील आणि संस्कृती शिंदे या विद्यार्थिनींनी देखील शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांची सविस्तर माहिती सांगितली. जीत पाटील या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती. इयत्ता 2 री आणि 3 रीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांना वंदना करणारे नृत्य सादर केले. अनुष्का सुर्वे या विद्यार्थिनीने जिजाऊ मासाहेबांच्या वेशभूषेत जिजाऊंचे मनोगत व्यक्त केले. अनुष्का सुर्वे आणि नैतिक पाटील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली. ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
         विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याला शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच समूहगीतासाठी शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp