Post Top Ad
Responsive Ads Here
16/03/2024
Home
Unlabelled
चोपडा येथे " जागतिक ग्राहक दिन " उत्साहात संपन्न . . . .
चोपडा येथे " जागतिक ग्राहक दिन " उत्साहात संपन्न . . . .
चोपडा तहसील कार्यालया मार्फत दिनांक 15/03/2024 वार शुक्रवार रोजी "जागतिक ग्राहक दिन" नविन प्रशासकीय इमारत मिटिंग हाॅल, चोपडा येथे, संपन्न झाला. या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा चोपडा, आणि ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य आणि प्रमुख पाहुणे मंचावर उपस्थित होते. 15 मार्च हा "जागतिक ग्राहक दिन" या कार्यक्रमाला श्री. कैलास महाजन (अशासकीय सदस्य ग्रा. षरिषद जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव) जागतिक ग्राहक दिन म्हणजे काय ? अधिकार आणि फायदे व तोटे, ग्राहकाने नक्की काय करावे, आपले प्रश्न कसे सुटतील, कोणाकडून सुटतील, त्यासाठी काय करावे, कोणा कडे जावे. आणि ग्राहकाने लेखी स्वरुपात अर्ज कोणाकडे द्यावे, आणि दिलेल्या अर्जाची पोहोच घ्यावी. असे अनेक मार्गाने ग्राहकाचे प्रश्न सुटतील इतके अनेक त्रुटीचें समस्याचें निवारण कसे करता येईल सोपे भाषेत ग्राहकांना. "जागतिक ग्राहक दिन" दिना निमित्ताने ग्राहकांना समजावून मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रा. केदार पाटील यांनी काॅम्प्युटर, तसेच मोबाईल द्वारे ग्राहकांची कशी फसवणूक केली जात आहे, याबाबत त्यांनी अतीशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे, मोबाईल वरती काही लिंक पाठविले जाते लिंक दाबल्यावर आपणास आपल्या बॅंक अकाउंट ला 50,000/- हजार रुपये येतील, असे सांगितले जाते आणि आपण लिंक वरती क्लिंक केले की आपले अकाउंट मधील पैसे जातात. आणि नंतर ती व्यक्ती सापडत नाही, म्हणून आपण सायबर कॅफे द्वारे त्यांना कसे पकडता येतात ते त्यांनी मार्गदर्शन केले. अगदी तंतोतंत अभ्यासपूर्वक ग्राहकांना मार्गदर्शन लाभले आहे.
या कार्यक्रमाला ग्राहक पंंचायत महाराष्ट्रच्या जिल्हा सचीव श्री. उदयकुमार अग्निहोत्री व जिल्हा कोषाध्यक्ष श्री. गुरुबक्ष जाधवानी यांनी उपस्थित नागरीकांना ग्राहक पंचायतीने छापलेली दिनदर्शिकेचे वितरण केले प्रमुख पाहुणे. श्री. देवेंद्र एम नेटकर ( पुरवठा निरीक्षक अधिकारी चोपडा ) श्री. सुदर्शन दुर्योधन ( पुरवठा निरीक्षक चोपडा) श्री. योगेश बी. नंन्नवरे ( गोदाम व्यवस्थापक चोपडा) श्री.उदयकुमार अग्निहोत्री ( जिल्हा सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अशासकीय सदस्य, जि. ग्रा. स.परिषद जळगांव) श्री. अनिल बारी ( तालुका संघटक ग्रा. पं.महाराष्ट्र) श्री.भुपेद्र सुभाषलाल गुजराथी (तालुका सचिव ग्रा.पं.महाराष्ट्र) श्री. डाॅ.पृथ्वीराज सैंदाणें ( चोपडा तालुका प्रसिद्धी प्रमुख ग्रा. पं.महाराष्ट्र) श्री. महेश कुमार पोतदार ( तालुका सदस्य ग्रा. पं. महाराष्ट्र) श्री. संतोष पाटील ( तालुका सदस्य ग्रा पं. महाराष्ट्र) श्री. राधेश्याम पाटील ( सामाजिक कार्यकर्ते ग्राहक चळवळ) श्री. नरेंद्र वसंतराव पाटील सौ.संध्याताई नरेश महाजन ( शहर अध्यक्ष ग्रा. क.फाऊंडेशन) प्रमुख पाहुणे उपस्थित होते तालुक्यातील आदिवासी बांधव व सुजाण नागरिकांची. उपस्थिती बहुसंख्येने होती. आणि शेवटी श्री. कैलास महाजन यांनी आभार व्यक्त केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment