Post Top Ad
Responsive Ads Here
12/03/2024
Home
Unlabelled
चोपडा तालुक्यातील गणपूर प्राथमिक शाळेत रंगतरंग कार्यक्रमात चिमुरड्यांची धमाल ...
चोपडा तालुक्यातील गणपूर प्राथमिक शाळेत रंगतरंग कार्यक्रमात चिमुरड्यांची धमाल ...
चोपडा तालुक्यातील गणपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन "रंगतरंग" कार्यक्रमात चिमुरड्यांनी विविध गाण्यांवर थिरकत उपस्थितांच्या टाळ्या मिळवत अक्षरशः धमाल उडवली.
सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या वतीने वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भूषण भिल होते. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, कानबाई गीत, पोवाडा, पाळणा, कोळीगीत, आदिवासी गीते, देशभक्तीपर गीते, व विविध गीते सादर केली. राजेन्द्र पारे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाला ऍड बाळकृष्ण पाटील, भालचंद्र पाटील, प्रमोद पाटील, विजय पाटील, हरी पाटील, अरुण गुजर, संजय पाटील, आत्माराम पाटील, मंगेश भोईटे, उत्तमराव पाटील, बापू महाजन, ग्राम पंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment