आर डी पाटील ICONIC MENTOR IN COACHING AWARD पुरस्काराने सन्मानित ~ ~ ~ - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

13/03/2024

आर डी पाटील ICONIC MENTOR IN COACHING AWARD पुरस्काराने सन्मानित ~ ~ ~

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        आर डी पाटील  ICONIC MENTOR IN COACHING AWARD पुरस्काराने सन्मानित ~  ~

          चोपडा येथील पंकज विद्यालयाचे उपशिक्षक आर डी पाटील यांना  ICONIC MENTOR IN COACHING AWARD 2024 हा पुरस्कार  ATMIA GLOBAL EDUCATION SERVICE  MUMBAI व विद्या प्रबोधिनी जळगाव तर्फे प्रदान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम व सेवांसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.

           सदर पुरस्कार जळगाव येथील आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत डॉ चिराग वाघेला ( संचालक - आत्मिया एज्युकेशन, मुंबई ) , रोहीत गोकाणी ( संचालक - आत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस, मुंबई - नाशिक - जळगाव ) , योगेश पाटील ( संचालक - विद्या प्रबोधिनी, जळगाव ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम रिगल थिएटर , नेहरू चौक, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

         त्यांच्या या यशाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे , संचालक पंकज बोरोले, सचिव अशोक माधव कोल्हे , संचालक नारायण बोरोले , संचालक गोकुळ भोळे यांच्यासह मुख्याध्यापक एम व्ही पाटील ( प्राथमिक ) , मुख्याध्यापक व्ही आर पाटील  ( माध्यमिक ) , प्राचार्य डॉ आर आर अत्तरदे , प्राचार्य मिलिंद पाटील , प्राचार्य केतन माळी , बालविभाग प्रमुख सौ रेखा पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नातेवाईक व मित्र परिवार कडून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज