ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम ; उलगडली विविध आध्यात्मिक रहस्ये . . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

08/03/2024

ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम ; उलगडली विविध आध्यात्मिक रहस्ये . . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
          ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम ; उलगडली विविध आध्यात्मिक रहस्ये . . . .
          ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले . त्यात मुख्य आकर्षण होते 11, 108  मोतींनी बनलेली शिवलिंग व मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनी.
           सकाळी विद्यालयाच्या स्थानिक शाखेतर्फे शिवध्वजारोहण करण्यात आले. भाऊसाहेब थोरात (तहसिलदार) , कैलास पाटील (माजी आमदार) यांच्या शुभहस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अवगुणमुक्त, व्यसनमुक्त, विकारमुक्त करण्यासाठी शिवप्रतिज्ञाही उपस्थितांना ब्र.कु.मंगला दीदींनी दिली. याप्रसंगी शहरात रॅली, शिवमंदिरात आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
        @  प्रदर्शनी ठरले भाविकांचे आकर्षण @
        शहरातील शिवमंदिरात मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले. त्यात स्वत:चा वास्तविक परिचय, परमात्म्याची दिव्य कर्तव्य, सृष्टीचक्राचे रहस्य, मृत्यूनंतर काय ? मृत्यूपूर्वी काय या सारख्या विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आलीत.
         ब्र.कु.मंगला दिदींनी राजयोगाची विधी आणि अनुभूतीही करविली. नागरीकांना राजयोगाच्या अभ्यास स्थानिक शाखेत विनामुल्य मिळणार असल्याचे आवाहनही आयोजकांनी या प्रसंगी केले. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ सुरेश बोरोले, ॲड घनश्याम पाटील, पंकज पाटील, सुरेश पाटील, रविंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
          कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी मंगला दीदी, सारिका दीदी, करिश्मा बेन, काजल बेन,अनिता बेन, वंदना बेन, शुभांगी बेन महेंद्र भोळे, पंकज भाई, ईश्वर भाई, चौधरी सर आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज