मतदारांना घरबसल्या मिळणार वोटर स्लिप ; 319 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार 3 लाख मतदार चिठ्ठी चे वाटप.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/04/2024

मतदारांना घरबसल्या मिळणार वोटर स्लिप ; 319 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार 3 लाख मतदार चिठ्ठी चे वाटप....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          मतदारांना घरबसल्या मिळणार वोटर स्लिप 

        319 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार 3 लाख मतदार चिठ्ठी चे वाटप....

         दि.13 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. 2 मे पर्यंत चोपडा विधानसभा मतदारसंघातील 3,22,228 मतदारांना घरबसल्या त्यांची मतदार चिठ्ठी मिळावी म्हणून 319 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी त्यांना मुदतीत मतदार चिठ्ठी वाटप पूर्ण करण्याचे सुचित केले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे आदी हजर होते.
            यावेळी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व साहित्याचे वाटप साहित्य नोडल अधिकारी रविंद्र माळी यांनी केले. तसेच सर्व केंद्र स्तरीय अधिकारी यांना शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. घरोघरी मतदार चिठ्ठी चे वाटप करताना घरातील सज्ञान व्यक्तीच्या हाती मतदार चिठ्ठी देण्यात यावी तसेच कोणत्याही स्वरूपाची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदार चिठ्ठी दिल्या बाबत नोंद वहीवर सही घ्यावी. तसेच शिल्लक मतदार चिठ्ठी 2 मे नंतर अनुपस्थित, स्थलांतरित व मयत  मतदारांच्या याद्यांसह तहसिल कार्यालयात जमा करण्यात यावे.

         यापूर्वी मतदार चिठ्ठीवर मतदाराचे फोटो होते मात्र यावेळेस त्या ठिकाणी बारकोड देण्यात आलेले आहे, हा बारकोड स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी मतदाराचा संपूर्ण तपशील दिसणार आहे तसेच मतदार संघाच्या पाठीमागील बाजूवर मतदान केंद्राचा मार्ग देखील दर्शविण्यात आलेला


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp