Post Top Ad
Responsive Ads Here
26/04/2024
Home
Unlabelled
चहार्डी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न . . . .
चहार्डी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न . . . .
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी बचत गटातील महिलांना मतदान नोंदणी करण्याचे आवाहन केले. मतदान करण्यासाठी प्रतीज्ञा घेण्यात आली. मतदान केंद्राचे तपशील, वोटर हेल्पलाइन ॲप, मतदानासाठी आवश्यक असलेले बारा ओळखीचे पुरावे, मतदान केंद्रावर मतदानाचा दिवशी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, प्रथमोपचार, प्रतीक्षागृह, गरोदर महिला बैठक व्यवस्था, इ.सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे याबाबत मतदारांना माहिती देण्यात आली. बचत गटामार्फत गावामध्ये लोकांना मतदानासाठी प्रेरित करावे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे वाहन बचत गटातील महिलांना करण्यात आले. “ मतदान : पवित्र दान " , " लोकशाहीचा सर्वोच्च क्षण : मतदान ", देशाचे उज्वल भविष्य व विकासासाठी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू अशा घोषणा देत यावेळी बचत गटातील महिलांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. सर्व मतदारांनी आपले स्वयंस्फूर्तीने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे आणि लोकशाही मजबूत करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी झाले येथील सरपंच चंद्रकलाबाई पाटील, प्रभाग समन्वयक उदयभान कोळी, तालुका अभियान व्यवस्थापक गोपाळ तातो, तालुका व्यवस्थापक विजय पाटील, प्रभाग समन्वयक विनोद पावरा, विजय मोरे, भिकन पिंजारी तसेच सखी महिला प्रभाग संघाचे सर्व समुदाय, संसाधन व्यक्ती, बँक सखी, कृषी सखी, ग्रामसंघ पदाधिकारी, बचत गट सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment