चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

03/05/2024

चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा . . . .

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा येथे मुख्य निवडणूक निरीक्षक मीना यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा . . . .

          लोकसभा निवडणुकी निमित्त प्रशासनाद्वारे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अशातच रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदारसंघात मुख्य निवडणूक निरीक्षक अशोककुमार मीना यांनी चोपडा तहसील कार्यालयात भेट दिली. लोकसभा निवडणूक कामकाजाची तयारीबाबत पाहणी केली. 

         यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, सर्व नोडल अधिकारी, व सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            पाहणी दरम्यान त्यांनी स्ट्रॉगरूमला भेट दिली. तसेच  सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन  यंत्रणा, मतदार यादी परीक्षण प्रक्रिया व इतर सुरक्षेबाबत पाहणी केली. प्रशासनामार्फत  निवडणूक कामी सर्व कामकाजा बाबत तयार केलेल्या कंट्रोल रुमची पाहणी केली. एक खिडकी कक्ष, मिडीया कक्ष, सीव्हिजिल कक्ष यांची पाहणी करुन कामकाजाची माहिती घेतली. आवश्यक सुचना दिल्या. निवडणुकीच्या कामात सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी निःपक्षपातीपणे तपासणी करण्यात यावी. टपाली मतदार कक्षात भेट देवून गृह मतदान  बाबतीत सुचना दिल्या. तसेच निवडणुक कामी नियुक्त सर्व सेक्टर अधिकारी यांचा आढावा घेण्यात आला. मतदानाच्या दिवशी काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक कामात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी कोणाच्याही घरी जावू नये अशी सक्त ताकीद दिली. केंद्रस्तरीय अधिकारी यांना सखोल व सविस्तर सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. पाहणीनंतर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp