अमळनेर तालुक्यातील भिलाली ते हिवरखेडा रस्त्याची निपक्ष चौकशी व्हावी वैशाली पाटील यांची मागणी - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

13/04/2024

अमळनेर तालुक्यातील भिलाली ते हिवरखेडा रस्त्याची निपक्ष चौकशी व्हावी वैशाली पाटील यांची मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) : - -

          अमळनेर तालुक्यातील भिलाली ते हिवरखेडा रस्त्याची निपक्ष चौकशी व्हावी वैशाली पाटील यांची मागणी 

         अमळनेर तालुक्यातील भिलाली ते हिवरखेडा हा रस्ता पाणंद योजनेअंतर्गत मंजूर झाला असून सदर रस्त्यावर रोजगार हमी योजना चे मजूर लावून काम होणे गरजेचे आहे. परंतु तसे न होता संबंधित ठेकेदार हा रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने काम करून घेत आहे. व खोटे मजूर दाखवून त्यांच्या नावे पैसे काढत असल्याची तक्रार वैशाली दत्तू पाटील यांनी लेखी तक्रार देवून सदर कामाची चौकशी व्हावी. अशी मागणी केली आहे.

         त्यांनी पुढे असे हि नमूद केले आहे की, मी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कडे संबंधित कामाचे टेंडर ची प्रत द्या. अशी मागणी केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी आमच्या कडे त्या कामाची कसलीही कागदपत्रे नाहीत असे उत्तर दिल्यामुळे मी या लेखी तक्रार द्वारे सदर कामाची निपक्ष पणे चौकशी करून संबंधित ठेकेदारावर रितसर कारवाई करावी. अशी मागणी वैशाली दत्तू पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज