ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये उन्हाळी शिबिराचे यशस्वी आयोजन.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

25/04/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये उन्हाळी शिबिराचे यशस्वी आयोजन....


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये उन्हाळी शिबिराचे यशस्वी आयोजन....

          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागात उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांची सर्जनशीलता वृद्धिंगत करण्यासाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले.  मुलांचे बौद्धिक तसेच मानसिक कौशल्ये विकसित करण्यासाठी शिबिर खूप उपयुक्त ठरले. या शिबिरामध्ये मुलांसाठी पाम ॲक्टिव्हिटी, डान्स, संगीत, विविध प्रकारचे खेळ, आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटी, योगा, बौद्धिक विकासाचे खेळ, फायर लेस कुकिंग यांसारख्या विविध मनोरंजनात्मक, ज्ञानवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे गुढी पाडवा, राम नवमी आणि हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला.
          गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याच्या उत्सवाच्या अनुषंगाने शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील यांनी गुढीपाडव्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. रामनवमीच्या उत्सवाच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यासारख्या विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या.  राम जन्माची माहिती शाळेतील शिक्षिका मनीषा चौधरी यांनी दिली. रामायणातील विविध पात्रांची माहिती शाळेतील शिक्षिका शितल भावसार आणि जुईली ठाकरे यांनी दिली. फ्रुट्स डे सारखा अनोखा उपक्रम या उन्हाळी शिबिरात राबविण्यात आला. यामध्ये कलिंगड पासून केक, होडी तसेच आंब्यापासून कासव आणि विविध फळांपासून झाड बनविण्यात आले. या शिबिरामध्ये मुलांना ज्ञानवर्धक कार्टून फिल्म दाखविण्यात आली. 

          उन्हाळी शिबिराची सांगता आजी - आजोबा दिवस साजरा करून करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आजी -आजोबांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते आजी आजोबांचे पूजन करण्यात आले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती आणि उपमुख्याध्यापक अमन पटेल यांच्या हस्ते आजी - आजोबांचा सत्कार करण्यात आला.

         शिक्षिका कामिनी पाटील आणि माधुरी पाटील यांनी आजी - आजोबांबद्दल कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे जुईली ठाकरे, शितल भावसार, मनिषा चौधरी, सोनाली देवरे यांनी आजी - आजोबांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन केले.

          उन्हाळी शिबिरात क्रिडा शिक्षक भूषण गुजर  सर यांनी मुलांना अनेक प्रकारच्या खेळांची प्रात्यक्षिक दाखविले आणि मुलांना खेळांमध्ये सहभागी करून घेतले. शाळेतील शिक्षिका दिपाली पाटील यांनी कथाकथन सादर केले. त्याचप्रमाणे संगीत शिक्षिका अश्विनी ढबु यांनी मुलांना कविता शिकविल्या. दिपाली पाटील यांनी उन्हाळी शिबिरात मुलांना नृत्य शिकविले . या शिबिरासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सुचिता पाटील, माधुरी पाटील, जुईली ठाकरे, कामिनी पाटील, शितल भावसार, मनिषा चौधरी आणि सोनाली देवरे यांनी परिश्रम घेतले. या सर्व शिक्षकांना शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज