ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/04/2024

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांची उद्योगकेंद्रास शैक्षणिक भेट

        महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मंगरूळ, तालुका चोपडा येथील 'कावेरी फूडस्' या उद्योग केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्प्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

          कावेरी उद्योग केंद्रामध्ये केळी आणि बटाट्याचे वेफर्स बनवण्यात येतात. केळी तसेच बटाट्याची साल सोलणे, त्यांचे चिप्स बनवण्यापासून तर तळण्याची प्रक्रिया तसेच चिप्स पॅकेजिंगची प्रक्रिया याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. चिप्स जास्त दिवस टिकण्यासाठी फूड पॅकेजिंग करताना नायट्रोजन गॅसचा वापर करण्यात येतो. पाच रुपयाच्या छोट्या चिप्स पॅकेट पासून ते एक किलो वजनाच्या चिप्स पॅकेटचे पॅकेजिंग ऑटोमॅटिक मशीन द्वारे केले जाते. तिखट, नमकीन तसेच पुदिना यांसारख्या विविध स्वादानुसार फूड प्रॉडक्ट्स येथे तयार केले जातात. मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती उद्योग समूहाचे संस्थापक व संचालक कपिल न्याती यांनी विद्यार्थ्यांना दिली. 

         सदर शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांसोबत शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल तसेच शाळेतील शिक्षिका दीप्ती पाटील, विशाखा बडगुजर आणि वैभव मराठे उपस्थित होते. या शैक्षणिक सहलीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज