Post Top Ad
Responsive Ads Here
04/05/2024
Home
Unlabelled
रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा मतदारसंघात 43 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा अधिकार....
रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा मतदारसंघात 43 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा अधिकार....
सकाळी सात वाजेपासून या पथकांनी गृह मतदानाची प्रक्रिया सुरू केली. संध्याकाळ पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सदर साहित्य सुरक्षा कोठडीत जमा करण्यात आली आहे. सदर गृह मतदान पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने मेहनत घेतली. सदर गृह मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट दिली. प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे, नोडल अधिकारी योगिता न्याहाळदे, सहाय्यक नोडल अधिकारी सतीश बोरसे, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment