रावेर लोकसभा निवडणुकीत चोपडा मतदार संघात 62 • 33% मतदान ; मतदान उत्साहात व शांततेत संपन्न . . . . - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/05/2024

रावेर लोकसभा निवडणुकीत चोपडा मतदार संघात 62 • 33% मतदान ; मतदान उत्साहात व शांततेत संपन्न . . . .


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          रावेर लोकसभा निवडणुकीत चोपडा मतदार संघात 62 • 33% मतदान ; मतदान उत्साहात व शांततेत संपन्न . . . .

           लोकसभा सर्वत्रिक निवडणुकीत चोपडा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत संपन्न झाली. चोपडा विधानसभा मतदार संघातील 319 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला 62 • 33 % टक्के मतदान पार पडले. 
         मतदानासाठी सकाळ पासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. अनेक मतदार केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या सोयी सुविधांमुळे मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये दिसत होता.
           मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मतदान केंद्रांना सुशोभित करण्यात आले होते. लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या या मतदान प्रक्रियेत 162 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आली. रात्री पर्यंत गांधी शिक्षण मंडळ संचलित सुरेशजी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम यंत्रे आणि साहित्य स्वीकारण्यात आले. कडक सुरक्षा व्यवस्थेत हे मतदान यंत्रे रात्री जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
          मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp