.रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी साठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची जय्यत तयारी.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/05/2024

.रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी साठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची जय्यत तयारी....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची जय्यत तयारी...

         रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी साठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. म गांधी शिक्षण मंडळ संचलित डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारून क्षेत्रनिहाय कक्ष स्थापन करण्यात आले होते. या कक्षांच्या माध्यमातून सुटसुटीत पद्धतीने मतदान पथकांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे कमी वेळात उत्तम पद्धतीने साहित्य वाटपाचे काम संपन्न झाले.
            यावेळी मतदार संघातील 38 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 319 मतदान केंद्रांवर पथके रवाना झाली. यात तीन सखी मतदान केंद्र, दोन दिव्यांग मतदार केंद्र, एक युवा मतदान केंद्र तर पाच आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
       पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी 30 बसेस, 10 मिनी बसेस, आणि 69 खाजगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. 

          सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, निवडणूक प्रशिक्षक नरेंद्र सोनवणे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी, निवडणूक कामी नियुक्त करण्यात आलेले सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उत्तम नियोजनासाठी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp