चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वांच्या सहकार्याने विकासाकडे वाटचाल - - सभापती नरेन्द्र पाटील - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

25/05/2024

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वांच्या सहकार्याने विकासाकडे वाटचाल - - सभापती नरेन्द्र पाटील

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वांच्या सहकार्याने विकासाकडे वाटचाल - - सभापती नरेन्द्र पाटील

          चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी , व्यापारी , हमाल , मापाडी व कर्मचारी यांचा समन्वय साधुन बाजार समितीचा विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असतो या विकासात माजी आ.चंद्रकांत सोनवणे व चोपडा तालुक्याचे आ. सौ. लताताई सोनवणे यांचे वेळोवेळी अनमोल सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच त्यांनी विकासनिधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासाचा महामेरू उभा राहिला आहे.

          मला सभापतीच्या खुर्ची वर माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी बसविले मी नवखा असल्यावर देखिल मला सर्वांनी सांभाळून घेतले आणि विकास कार्यात सहकार्य करत आहेत त्यामुळेच आम्ही 24/5/2023 ते  23/5/2024 अखेर बाजार समितीचे एकावर्षाच्या कारकिर्दीत आता पर्यतचे विक्रमी उत्पन्न (3,90,00,000) ऐवढे घेतले आहे. मागिल वर्षाच्या उत्पन्न रु. 2,07,00,000/- एवढे आलेले होते मागिल वर्षापेक्षा आता पर्यत रु 1,83,00,000/- एवढे जास्तीचे उत्पन्न बाजार समितीला मिळाले आहे खांदेशातील चोपडा बाजार समितीने शेतकरी बांधवांन करीता एकमेव शेतकरी निवास संचालकाच्या संकल्पणेतुन सर्व सुखसोईयुक्त भव्य असे शेतकरी निवास सुरु करण्यात आलेले आहे. त्या शेतकरी निवासाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधव घेत असतात.
          उपबाजार अडावद येथे भुसार मालाचे दिर्घ काळा पासुन लिलाव बंद होते ते पुन्हा नव्याने लिलाव सुरु करण्यांत आलेले आहे. गलंगी सबयार्डात लवकरच भुसार मालाचे लिलाव सुरु करण्यांत येतील. शेतकरी बंधुसाठी शेतशिवार रस्ता तयार करणेसाठी लवकरच जे.सी.बी घेण्यांचा मानस आहे. बाजार समिती मध्ये शेतकरी बांधवाच्या मुला - मुलीसाठी MPSC , UPSC स्पर्धापरीक्षेची तयारी करणेसाठी अभ्यासिका केंद्र सुरु करण्यांचा मानस आहे. शेतकरी बांधवांनी विनापरवाना धारक व्यापाऱ्यानां परस्पर आपला शेतमाल विकु नये. लवकरच जास्तीत जास्त शेतमाल बाजार समितीत विक्री साठी आणावा यासाठी संचालकांची व शेतकरी बंधुंची प्रत्येक गावात मिटिंग घेऊन भेट घेणार आहेत. तसेच मुख्य मार्केट यार्डातील लिलाव शेड दुरुस्ती करण्यांत आलेले आहे. सी.ए.सेल्स ते पाण्याच्या टाकी पर्यत क्राँक्रीट रस्ता करण्यांत आलेले आहे. आँफीस ईमारत कलरींग व दुरुस्ती करण्यांत आलेले आहे. सभागृह नुतनीकरण करण्यांत आलेले आहे. मार्केट यार्डातील कामकाज संगणीकरण व ऑनलाईन करण्यांत आलेले आहे
     चोपडा, अडावद व गलंगी येथील भूई काट्यावर मोजमाप झाल्यानंतर शेतकऱ्याना एस.एम.एस.सुविधा करण्यांत आलेली आहे. मार्केटच्या आँफीस ईमारत मागे शिवभोजन साठी पतरी शेड करण्यांत आलेले आहे. तसेच गुरांसाठी पतरी शेड व गुरासाठी पाण्याची सुविधा करण्यांत आलेली आहे. पुर्ण झालेल्या विकास कामाची एकुण रक्कम 44,03,832/- इतके खर्च झालेला आहे. तसेच यापुढेही अनेक विकास कामाचा आम्हा संचालक मंडळाचे मानस आहे.

          त्यात मुख्य मार्केट यार्डातील गट नं.1156 मधील शाँ.काँ टप्पा नं.2 मागे मोकळ्या जागेत गोडावुन करण्यांत येणार आहे. त्यासाठी 55,60, 699/- इतकी निधीचा प्रस्ताव सहा.निबंधकाकडे मंजुरी साठी पाठविले आहे. गट नं.1160 मधिल वाँल कंपाउंड लगत पुर्व जागेत मोठे शाँपींग काँम्पलेक्स व मोठे हाँल करण्यांत येणार आहे. त्यासाठी 1,96,11,317/- हा प्रस्ताव पणन महासंचालकाकडे पाठविला आहे. गट नं. 1157/1 व गट नं. 1156 ला लागुन गुरांसाठी बंदिस्त प्रेस्टीज वाँल कम्पावूड बांधकाम करण्यांत येणार आहे. 2,73,572/- हा निधी मंजूर असून आचारसंहिता संपल्या नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल एकुण प्रस्तावित कामे 2,54,45,588/- इतक्या रुपयांचे आहेत.

         उपबाजार आवार गलंगी येथे रस्ते, गोडावुन, भुयार गटार, शॉपिग सेंन्टर, 5000 मे.टनाचे कोल्ड स्टोरेज असे विविध विकास कामे करण्याचा मानस आहे. त्यासाठी लागणारा खर्च अंदाजे 4,54,34,810/-  रुपये हा ही प्रस्ताव पणन महासंचालकाकडे पाठविला आहे. चोपडा व गलंगी प्रस्तावित कामाची एकुण रक्कम रुपये 7,08,80,398/- इतकी आहे. बाजार समितीत करण्यांत आलेली विकास कामेची त्यांनी लेखाजोखा मांडला त्यात आठवडे गुरांच्या बाजार शेतकऱ्यांसाठी थंड पाणी व्यवस्था करण्यांत आलेली आहे. गलंगी सबयार्डात आँनलाईन सि.सि.टिव्ही सिस्टीम सुरु करण्यांत आली आहे. शेतकरी वर्गास बाजार समितीचे दैनदिन बाजार भाव व सुटी बाबत माहिती मिळावी म्हणुन फेसबुक व व्हाँटसअप गृप तयार करण्यांत आलेले आहे

         बाजार समितीत नविन करण्यांत येणारी कामे मुख्य मार्केट यार्डात शेतकरी व हमाल , मापाडी बांधवानसाठी शिवभोजन केंद्र सुविधा लवकरच सुरु करण्यांत येणार आहे. चोपडा, व अडावद सबयार्डात व भूईकाट्यावर नविन आँनलाईन सी.सी.टि.व्ही सिस्टीम करण्यांत येणार आहे. भव्यदिव्य प्रवेशव्दार करण्यांत येणार आहे. धानोरा येथे सबयार्ड व भूईकाटा स्थापन करण्याकरीता ग्रामपंचायत यांचेकडे जमिन मिळणेसाठी प्रयत्न सुरु आहे. घोडगांव येथे पाच एकर जागा बऱ्याच दिवसापासुन पडुन आहे तेथे केळी पँकींग हाउस करण्यांचा मानस आहे. तसेच अडावद , गलंगी येथे नविन करण्यांत येणारी विकास कामे अडावद येथे जागा अपुर्ण पडत असल्याने नविन जागा घेण्याचा मानस असून तिथे नविन गोडावुन करण्यांत येतील.

        बाजार समितीस कार्यक्षम सन्माननिय संचालक मंडळ लाभल्याने शेतकरी बांधवांच्या सहकार्याने तसेच बाजार आवारातील व्यापारी बांधव हमाल मापाडी कर्मचारी व ईतर घटकांच्या सहकार्याने बाजार समितीची वाटचाल यशस्वी पणे पार पाडली जात आहे ही बाब उल्लेखनीय व भुषणावह बाब आहे. चोपडा कृषि उत्पन्न बाजार समिती हि एक आदर्श बाजार समिती गणली जावी व बाजार समितीचे जास्तीत जास्त उत्पन्न वाढविण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे व राहील. तरी शेतकरी बंधुनी भुसार माल मुख्य मार्केट यार्डात व अडावद सबयार्डात जास्तीत जास्त प्रमाणांत विक्रीसाठी आणावा असे जाहीर आवाहनही बाजार समितीकडून करण्यांत आले

          तद्नंतर चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती नरेन्द्र पाटील यांनी सांगितले की, मला एक वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आजच्या पत्रकार परिषदेत आम्ही सर्वांच्या सहकार्याने हा लेखाजोखा मांडला आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायक चव्हाण, माजी सभापती घनश्याम आण्णा पाटील, संचालक डॉ.अनिल पाटील, नंदकिशोर पाटील, अड.शिवराज, विक्की सनेर, गोपाल पाटील, नंदकिशोर सांगोरे, सुनिल जैन, रावसाहेब पाटील, विजय पाटील, मिलिंद पाटील, सुनिल अग्रवाल, किरण देवराज, नितीन पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अतुल ठाकरे, व्यापारी दगडू अग्रवाल, सुनील जैन, जितेंद्र बोथरा, राजुभाऊ जैन, मोनेश पालिवाल, धिरज जैन, अजय अग्रवाल, बापू पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज