मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीची पहिली सभा संपन्न.... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

10/08/2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीची पहिली सभा संपन्न....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीची पहिली सभा संपन्न....

        मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीची पहिली सभा तालुका अध्यक्ष श्री नामदेव बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चोपडा येथे  दुपारी एक वाजता घेण्यात आली, सभेला समिती सदस्य श्री विकास काशिनाथ पाटील श्री गोरख भिवा कोळी, तसेच संरक्षण अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, बचत गटाचे तालुका समन्वयक, नायब तहसीलदार आर.आर. महाजन व सदस्य सचिव तथा तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात हे उपस्थित होते.
         तालुक्यातून सदर योजनेसाठी विक्रमी 38416 अर्ज आले व त्यापैकी 35973 अर्ज योजनेसाठी पात्र झाले आहेत, उर्वरित अर्ज त्रुटी अभावी अर्जदार यांना त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी परत पाठवले असून,  पूर्तता केल्यावर सदर अर्ज देखील मंजूर करण्याची कारवाई तात्काळ करण्यात येईल अशी माहिती सभेवेळी सदस्य सचिव यांनी दिली. 

          तसेच दिनांक 13/08/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमा बाबत केलेल्या नियोजनाची माहिती देखील यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे सदर योजनेचे पोर्टल सुरू असून पात्र लाभार्थी अद्यापही अर्ज करू शकतात, अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या सदस्य आशा सेविका व शासकीय कर्मचारी यांनी गावागावात संपर्क करून उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील सभेवेळी अध्यक्ष श्री नामदेव पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज