जय भवानी मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे जल्लोशात विसर्जन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/09/2024

जय भवानी मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे जल्लोशात विसर्जन

 

गणपूर ता.चोपडा (प्रतिनिधी) : - -

         जय भवानी मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे जल्लोशात विसर्जन

        गणपूर (ता. चोपडा) येथील गावातील सर्वेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात बसविण्यात आलेल्या जय भवानी मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे मोठ्या जल्लोशात मिरवणूक काढून अनेर तीरावर विसर्जन करण्यात आले. मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी निघालेली विसर्जन मिरवणूक रात्री अनेर तिरापर्यंत पोहचली.

         यावेळी मंडळाच्या तरुण व तरुणींनी विविध गीतांवर थिरकत नृत्य केली. गरभा नृत्य, गणेश वंदना व विविध गीतांवर तरुणाई यावेळी थिरकली. गावभर बँड च्या तालावर विविध गीते सादर करण्यात आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज