आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची महाराष्ट्राचे मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

08/09/2024

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची महाराष्ट्राचे मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्याची महाराष्ट्राचे मुख्य सचिव व विभागीय आयुक्त यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी... 

         भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य तसेच जळगांव जिल्हा मानव विकास पत्रकार संघ यांनी शासन परिपत्रकानुसार दि. 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना एका पञकान्वे ई.मेल व्दारे मागणी माहिती अधिकार हा कायदा नागरिकाना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जमाबदारी आहे.

        आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 28 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक - केमाअ 2008 पत्र क्र. 378 / 8 /सहा सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मुंबई दिनांक 20 सप्टेंबर शासन निर्णय आहे. सदर निर्णयानुसार दर वर्षी शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश आहे.

         या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे शासनाने सुचविलेले आहे. त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी.

         या वर्षी 28 सप्टेंबर 2024 या 'दिवशी शनिवार आहे. त्यामुळे 28 सप्टेंबर 2024 रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा 26 सप्टेंबर 2024 किंवा 27 सप्टेंबर  2024 या दिवशी साजरा करावा तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व कार्यालयांना तातडीने कराव्यात. अशा मागणीचे हेमकांत गायकवाड , जळगाव जिल्हाध्यक्ष - भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य तसेच जळगांव जिल्हा सचिव - मानव विकास पत्रकार संघ यांनी एका पञकान्वे ई.मेल द्वारा विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज