शासन व शेतकऱ्यांमधील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी हा दुवा - ऍड प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

29/09/2024

शासन व शेतकऱ्यांमधील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी हा दुवा - ऍड प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         शासन व शेतकऱ्यांमधील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी हा दुवा - ऍड प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन

          राज्यात शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची संख्या खूप असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा उर्वरित शेतकऱ्यांना करून देण्याची आज गरज आहे. त्यामुळे संघाने वेळोवेळी शासनाकडे मागणी केलेल्या आणि रास्त असलेल्या मागण्या मान्य झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाला काम करताना पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना मध्यस्थ म्हणून उपयोग करून घेता येईल. असे मत शासकिय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ऍड प्रकाश पाटील यांनी राहुरी विद्यापीठाजवलील हिंदुस्थान ऍग्रो च्या प्रांगणात संघाच्या एक दिवसीय अधिवेशनात बोलताना मांडले.

        कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार होते. परंतु त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झालेमुळे त्यांचा दौरा रद्द झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते. शासनाच्या विविध समित्या, शासकीय धोरण व त्या संबंधित समित्या वर राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकाऱ्यांना प्राधान्याने प्रतिनिधित्व देण्याची आज गरज असून हेच पुरस्कार प्राप्त शेतकरी शासनाचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवू शकतील, त्यासाठी त्यांच्या मान्य करण्याची मागणी अधिवेशनात करण्यात आली. 

         यासोबतच शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेत मजुरी रोजगार हमी योजने तुन देणे, शेतकऱ्यांना चोवीस तास विज देणे, शेतमाल प्रक्रियेस चालना देणे, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य पद देणे ह्या मागण्या करण्यात आल्या. प्रातिनिधिक स्वरुपात शेतकऱ्यांचा सहपत्नीक शाल व पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी जोडप्यांना शाल व पैठणी सन्मानाने देण्यात आली. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले.

         शासकिय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष कृषिभूषण नाथराव कराड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास संघाचे, उपाध्यक्ष सदाशिव थोरात(परभणी), उपाध्यक्ष प्रल्हाद वरे(बारामती), कृषी क्षेत्रातील कृषीरत्न कांतराव देशमुख(परभणी), कृषीरत्न शेखर भरसावडे, कृषी रत्न बाळासाहेब पिसोरे, जळगाव जिल्ह्यातून संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ऍड बाळकृष्ण पाटील(गणपूर), जिल्हा अध्यक्ष प्रवीण बाबूलाल पाटील(फरकांडे), व सुमारे 100 शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्रातुन सुमारे दोन हजार पुरस्कार प्राप्त, प्रगतीशील शेतकरी सहपत्नीक आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज