चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा ..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/10/2024

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा .....


चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा .....

        कायद्याच्या नवीन तरतूदीनुसार आता मुलं - मुली जर आई - वडिल यांचे पालन पोषण करत नसतील तर आई वडिलांना न्यायालयात न जाता प्रांतांकडे अर्ज केल्यास प्रांत मुलं - मुली यांना आई - वडिलांच्या पालन पोषणासाठी पोटगी खर्च देण्याचा निर्णय / आदेश देण्याचा अधिकार असल्याचे प्रतिपादन चोपडा न्यायालयाचे विधीज्ञ श्री. एस्. डी. पाटील यांनी चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात संपन्न 1 ऑक्टोंबर जागतिक दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक समस्या, हक्क व अधिकार विषयक कायदेशीर मार्गदर्शन करतांना सांगितले . 

         तसेच सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या निर्माण होणाऱ्या समस्यां या नैतिक मूल्यांची होणारी घसरण, ज्येष्ठांविषयी अनादर व वाढत जाणारी विभक्त कुटुंब व्यवस्था या सम विविध कारणांमुळे होत असल्याचे निरिक्षण न्यायालयांनी नोंदविल्याचे संघाचे विधी तज्ज्ञ ॲड. व्ही बी पाटील यांनी स्पष्ट केले.

            1 ऑक्टोंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सेवा निवृत्त प्रा. व्ही के पाटील यांनी ज्येष्ठांच्या व्यथा मांडल्या तर व्ही. एच. करोडपती यांनी ज्येष्ठांच्या समस्या व योजनां विषयी माहिती दिली.

          कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, उपाध्यक्ष - जे. एस्. नेरपगारे, सहसचिव इंजि व्ही. एस्. पाटील, कोषाध्यक्ष - दिलीपराव पाटील, माजी अध्यक्ष व्ही. एच. करोडपती, माजी उपाध्यक्ष एम डब्ल्यू पाटील, सेवा निवृत्त मुख्या. सुभाष पाटील, मधुकर बाविस्कर, जगन्नाथ पाटील यां  आजी माजी पदाधिकाऱ्यांसह संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक - सूत्रसंचालन संघाचे सचिव विलास पाटील यांनी केले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp