हिंदी दिनानिमित्त अध्यापक विद्यालयात कविता व गीतांची मैफिल...... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

15/09/2024

हिंदी दिनानिमित्त अध्यापक विद्यालयात कविता व गीतांची मैफिल......


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         हिंदी दिनानिमित्त अध्यापक  विद्यालयात कविता व गीतांची मैफिल......

        चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय चोपडा येथे आज हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. यावेळी कार्यक्रमात वेगवेगळ्या गीतांचे, कवितांचे तसेच हिंदी दिनाची पार्श्वभूमी सांगणारे अनेक बाबी या वेळी  विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांद्वारे सांगितल्या. कार्यक्रमाची सुरुवात द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी ईश्वस्तवनाने केली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय किरण पाटील सर यांनी सरस्वती पूजन व झेप अंकाचे प्रकाशन केले.

         यावेळेस द्वितीय वर्षाची छात्र अध्यापिका रोशनी जावळेने हिंदीतील दोन कविता सादर केल्या. तसेच प्रथम वर्ष छात्र अध्यापिका दीक्षा शिरसाट हिने स्वरचित कविता व गीत सादर केले त्याचबरोबर समाधान महाजन या विद्यार्थ्याने छानशी हिंदी कवितेचे गायन केले. तसेच प्रथम वर्ष छात्र अध्यापिका अंजली पाटीलने हिंदी दिनाचे महत्त्व व तिची माहिती मार्मिक शब्दात सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण पाटील यांनी हिंदी दिवस का साजरा केला जातो हिंदीचे भारतातील महत्त्व तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच व्यवहारात तिचा होणारा उपयोग या सर्वांबद्दल मौलिक असे मार्गदर्शन छात्र अध्यापकांना केले . 

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री धनगर या विद्यार्थिनीने केले तसेच आभार प्रदर्शन द्वितीय वर्षे छात्र अध्यापिका वैष्णवी पाटील ने केले कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम ने झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज