Post Top Ad
Responsive Ads Here
09/10/2024
Home
Unlabelled
मराठी अभिजात भाषा निर्णयाचे विवेकानंद विद्यालयात जल्लोषात स्वागत....
मराठी अभिजात भाषा निर्णयाचे विवेकानंद विद्यालयात जल्लोषात स्वागत....
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात केंद्रशासनाने मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या निमित्त महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. मधुचंद्र भुसारे (गझलकार ) यांच्या व्याख्यानाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र भावे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते देवी शारदा, श्री संत ज्ञानेश्वर व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आपल्या व्याख्यानातून प्रा. डॉ. भुसारे यांनी मराठी भाषा समितीचे कार्य, संशोधन, अभिजात मराठी भाषे संदर्भातील निकष, ऐतिहासिक पुरावे, संविधानिक तरतुदी, अभिजात भाषेची पार्श्वभूमी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर व सखोल माहिती दिली. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी स्वरा हरताळकर, रुतुजा पाटील, पूजा पाटील, स्वरा शुक्ल यांनी ' लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ' हे गीत सादर केले. आदिती बडगे व सानवी पाटील यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्या बद्दलची माहिती सांगितली. प्रमुख वक्त्यांचा परिचय मराठीच्या शिक्षिका सौ. माधुरी हळपे यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आरुषी पाटील हिने केले. याप्रसंगी जेष्ठ शिक्षक श्री पवन लाठी, सौ. स्मृती माळी, श्री हेमराज पाटील, श्री प्रसाद वैदय व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment