तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा समारंभ संपन्न - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

07/10/2024

तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा समारंभ संपन्न

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा समारंभ संपन्न

         चोपडा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या माजी सचिव श्रद्धेय संध्याताई मयूर यांच्या स्मृतिपित्यर्थ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन अध्यापक विद्यालय, व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आलेले होते. यावेळी या स्पर्धेतून प्रथम व द्वितीय गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ अशा विद्यार्थ्यांचे प्रत्येक गटातून  निवड करण्यात आलेली होती. या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 डी एल एड प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर हे होते. प्रमुख अतिथी चोपडा येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉ. विनीत हरताळकर उपस्थित होते तसेच संस्थेचे समन्वयक आदरणीय गोविंदभाई गुजराथी, शिक्षणशास्त्र महाविद्यालय  प्राचार्य तथा केंद्र संचालक  आ. डॉ. आर. व्ही. सोनवणे मॅडम कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व ईश्वस्तवनाने करण्यात आली तद्नंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे 

            @ प्रथम गटातील मानकरी @

1) स्वरा विनीत हरताळकर (विवेकानंद विद्यालय, चोपडा)

2) स्पर्श डीगंबर पाटील (प्रताप विद्या मंदिर, चोपडा )

3) चैताली पाटील (सी. बी. निकुंभ माध्यमिक विद्यालय, घोडगाव) 

उत्तेजनार्थ : - 1) पाटील गौतम अनंत (झि.तो महाजन माध्यमिक विद्यालय,धानोरा )

2) बाविस्कर चेतना विजय (नूतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे)

               @ द्वितीय गटाचे मानकरी @ 

1) देशमुख रोहित संजय (पंकज उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा )

2) तांबट भूमिका नंदलाल (प्रताप विद्या मंदिर, चोपडा)

3) वळवी गीता देवजी (पंकज उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा

      उत्तेजनार्थ  : - 1) पाटील नेहा महेंद्र (पंकज उच्च माध्यमिक विद्यालय,चोपडा) 

2) देवराज जागृती विनोद (बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय,चोपडा ) अश्या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात आली. 

          यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माधुरीताई मयूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजचे तंत्रज्ञानाचे युग त्याचे फायदे तोटे व त्यातील आपल्या कार्यक्षमतेवर, स्मरणशक्तीवर कशा पद्धतीने परिणाम होत आहे याचे मार्मिक मार्गदर्शन उदाहरणाच्या माध्यमातून  केले. विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी द्यावा हे आवर्जून सांगितलं तसेच बक्षीस पात्र सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविकामध्ये विद्यालयातील प्राचार्य तथा केंद्र समन्वयक किरण पाटील सर यांनी विद्यालयाची व अभ्यास केंद्रची वाटचाल व स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगितला. 

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील अध्यापिका श्रीमती स्वाती गुजराती मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम. एन. मराठे सर यांनी केले यावेळी विजेते स्पर्धक  तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक बंधू भगिनी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज