वन्यजीव सप्ताहात प्रसंगावधानामुळे वाचले गंभीरपणे धोक्याच्या श्रेणीतील (CR/CE) दुर्मिळ कासव - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

07/10/2024

वन्यजीव सप्ताहात प्रसंगावधानामुळे वाचले गंभीरपणे धोक्याच्या श्रेणीतील (CR/CE) दुर्मिळ कासव


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

         वन्यजीव सप्ताहात प्रसंगावधानामुळे वाचले गंभीरपणे धोक्याच्या श्रेणीतील (CR/CE) दुर्मिळ कासव 

         चोपडा तालुक्यात गेल्या पंधरवड्यात तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शहराच्या सुंदर गढी परिसरातील नाल्यात डोंगराळ भागातून पावसाबरोबर एक कासव वाहत आले होते. पाऊस ओसरल्यावर सायंकाळी हे कासव परिसरातील रस्त्यालगत दोन युवकांना आढळून आले. हे कासव घरी पाळणे अथवा मांसासाठी नेण्याच्या हेतूने त्यांनी ताब्यात घेतले. स्थानिक नागरिक संजय माळी यांनी तात्काळ पक्षी व वन्यजीव संवर्धक हेमराज पाटील (केंद्रीय समिती सदस्य , वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग , दिल्ली) यांना फोन करून सदर कासव बद्दल माहिती दिली. तात्काळ तेथे हजर होऊन त्यांनी कासव ताब्यात घेतले. तेवढ्यात ते दोन युवक तेथून पसार झाले. हेमराज पाटील यांनी कासव घरी आणून पाण्याच्या मोठ्या टब मध्ये त्यास सुरक्षित ठेवले. 
          सदर कासवाची खात्रीशीर ओळख झाल्यानंतर हेमराज पाटील यांच्या लक्षात आले की हे अत्यंत दुर्मिळ प्रजातीतील गोड्या पाण्याचा अधिवास असणारे भारतीय मृदू कवच कासव अर्थात इंडियन सॉफ्ट शेल टर्टल ( गंगेतील मृदू कवच कासव ) आहे. संबंधित वन अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे कासव सुरक्षितपणे हेमराज पाटील व अश्विनी पाटील यांनी तालुक्यातील गोड्या पाण्याच्या मोठ्या जलाशयात त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

         वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार हे कासव परिशिष्ट I मधील असून सद्यस्थितीत आय यू सी एन रेड डाटा लिस्ट नुसार क्रिटिकली एडेंजरड् (CR/CE) श्रेणित आहे. वन्यजीव सप्ताहात अशा संकटग्रस्त प्राण्याला प्रसंगावधान राखून वाचविल्याबद्दल चोपडा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पी व्ही हाडपे , वनपरिक्षेत्र अधिकारी बी के थोरात , एस एम सोनवणे , जी आर बडगुजर , प्रशांत साबळे , सर्व वनपाल व कर्मचाऱ्यांनी सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून वने - वन्यजीव सेवेत कार्यरत असलेल्या दांपत्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज