नगरपालिका पाठीमागील अमरधाम जवळ वृक्षारोपण व परिसर सौंदर्यीकरणासाठी मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांची भेट - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/05/2025

नगरपालिका पाठीमागील अमरधाम जवळ वृक्षारोपण व परिसर सौंदर्यीकरणासाठी मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांची भेट

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         नगरपालिका पाठीमागील अमरधाम जवळ वृक्षारोपण व परिसर सौंदर्यीकरणासाठी मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांची भेट

        आज बुधवार, दिनांक 16 मे 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. राहुल पाटील यांनी नगरपालिका पाठीमागील अमरधामजवळील परिसर येथे भेट देऊन वृक्षारोपण व परिसर सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. या भेटीत श्री. पाटील यांनी परिसर स्वच्छ, हिरवागार आणि आकर्षक होण्यासाठी विविध उपाययोजनांची सूचना केली व तातडीने खालीलप्रमाणे कृती करण्याचे निर्देश दिले:

         बॉटल पाम ट्री लावणे – परिसरातील चारही बाजूंना बॉटल पाम ट्री लावण्याची कार्यवाही सुरू करणे. झाडांच्या आजूबाजूचा प्लास्टिक, पोलीथिन व इतर अवशेष साफ करून सुपीक खतांचा वापर सुनिश्चित करणे. चारही दिशांना मेहंदीची झाडे लावणे – पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांनी प्रत्येकी एक मेहंदीचे झाड योग्य खोदकाम, खत व आर्द्रतासामग्रीसह लावण्याचे आदेश.
           या सर्व झाडांसाठी खोदलेले खड्डे योग्य खोलीत व मापात तयार ठेवून नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे. झाडांच्या आरोग्यदायी वाढीसाठी आवश्यकतेनुसार खत व जलधारणेसाठी साहित्याचा वापर. वृक्षारोपणासाठी बुधवार, सकाळी 7:00 वाजता सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित राहतील याची नोंद व रेकॉर्ड ठेवण्याचे निर्देश.

        अमरधाम जवळील परिसराचे रूपांतर – वृक्षारोपण व सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून  हरित बागेत रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट. यासाठी पायवाट, चौकट, बैठकीची व्यवस्था यावरही पुढील नियोजन करण्याचे आदेश.

          या उपक्रमाद्वारे नगरपरिषदेच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, हरितीकरण आणि पर्यावरण जपण्याचा संदेश देण्यात आला असून, वेळोवेळी देखभाल करून हा परिसर सुंदर व सुसज्ज ठेवण्याचे आवाहन प्रशासकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज