महात्मा गांधी उद्यानात मुख्याधिकाऱ्यांची भेट – सुविधा सुधारणा व नवे खेळणी तात्काळ बसविण्याच्या सुचना... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/05/2025

महात्मा गांधी उद्यानात मुख्याधिकाऱ्यांची भेट – सुविधा सुधारणा व नवे खेळणी तात्काळ बसविण्याच्या सुचना...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         महात्मा गांधी उद्यानात मुख्याधिकाऱ्यांची भेट – सुविधा सुधारणा व नवे खेळणी तात्काळ बसविण्याच्या सुचना...

          आज दिनांक 16 मे 2025 रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. राहुल पाटील यांनी महात्मा गांधी उद्यानास भेट देऊन उद्यानातील विविध सुविधा , देखभाल व सौंदर्यीकरण कामांचा आढावा घेतला. या दौर्‍यात त्यांनी उद्यान व्यवस्थापनास काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या, 

        ज्या पुढीलप्रमाणे आहेत - ट्यूबवेलची तात्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करणे , ओपन जिममधील उपकरणांवरील शीट व संरचना दुरुस्त करून वापरण्यास योग्य बनवणे , सध्या बंद असलेल्या फाउंटेनची तांत्रिक दुरुस्ती करून पुन्हा कार्यान्वित करणे , सर्व व्यायाम साहित्य व खेळण्यांना नियमित ऑइलिंग व ग्रीसिंग करणे , झाडांची नियोजनबद्ध छाटणी करून सौंदर्य व सुरक्षितता राखणे , लहान मुलांच्या खेळण्यांची तातडीने दुरुस्ती करून ती सुरक्षित बनवणे , गवत व लॉनची नियमित मशिनद्वारे कटाई करून परिसर स्वच्छ ठेवणे
           या भेटीच्या निमित्ताने महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी सुमारे सात ते आठ लाख रुपये किमतीची आधुनिक व आकर्षक खेळणी उद्यानात बसवण्यात आली. यामुळे उद्यानातील वातावरण लहान मुलांसाठी अधिक आनंददायक व खेळावयास प्रेरक झाले आहे.

         शहरातील नागरिकांनी व लहान मुलांनी उद्यानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन माननीय मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांनी यावेळी केले. त्यांनी संबंधित विभागांना वरील सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. या उपाययोजनांमुळे उद्यानाची एकूण गुणवत्ता व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा निश्चितच सुधारतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज