क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूलला मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांची भेट - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/05/2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूलला मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांची भेट

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूलला मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांची भेट

          क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शॉपिंगच्या मागे या शाळेला आज दिनांक 16 मे 2025 रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. राहुल पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधांचा, विद्यमान अडचणींचा आणि आवश्यक सुधारणा योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

           यावेळी श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी खालील सुधारणा तातडीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले ;  आरओ वॉटर प्युरिफायर बसविणे – विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून शाळेमध्ये आरओ यंत्र बसवण्याचे आदेश. वर्गखोल्यांमध्ये तसेच इतर आवश्यक भागात विद्युत कामाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश. संगीत शिक्षणासाठी हॉल व साहित्य – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र संगीत हॉल उपलब्ध करून देणे व आवश्यक वाद्यसाहित्याची पूर्तता करण्याचे आदेश. शॉपिंगच्या मागील भागातील शौचालयातील गळकी पाइप त्वरित दुरुस्त करण्याचे निर्देश दिले तसेच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि इमारतीवर शाळेचे नाव “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूल” स्पष्ट आणि सुवाच्य स्वरूपात रंगवण्याचे आदेश.

         या भेटीद्वारे शाळेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधून विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित, सुसज्ज आणि शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज