मसाप चोपडा शाखेला परिषदेचा 'उत्कृष्ट शाखा पुरस्कार' जाहिर ; पुण्यात होणार पुरस्कार वितरण सोहळा... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

16/05/2025

मसाप चोपडा शाखेला परिषदेचा 'उत्कृष्ट शाखा पुरस्कार' जाहिर ; पुण्यात होणार पुरस्कार वितरण सोहळा...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         मसाप चोपडा शाखेला परिषदेचा 'उत्कृष्ट शाखा पुरस्कार' जाहिर ; पुण्यात होणार पुरस्कार वितरण सोहळा...

          महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 120 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट शाखा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदाचा राजा फडणीस पुरस्कृत 'महाराष्ट्र साहित्य परिषद उत्कृष्ट शाखा पुरस्कार' महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेला जाहिर झाला आहे. फिरता करंडक व रोख रक्कम स्वरूपातील हा पुरस्कार 27 मे रोजी पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

          महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असून गेल्या 119 वर्षांपासून मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेचे हे कार्य राज्य आणि राज्याबाहेर असलेल्या विविध शाखांच्या माध्यमातून प्रभावीपणे होत आहे. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षापासून चोपडा शाखा तालुका व परिसरात कार्यरत असून शाखेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचार प्रसार व संवर्धनासाठी कार्यक्रम केले जात आहेत. 

          शाखेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी प्रियजन स्मृती व्याख्यानमाला, काव्यमैफली, विद्यार्थ्यांसाठी भाषा ज्ञान स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांनी चोपडेकरांच्या सांस्कृतिक श्रीमंतीत भर घालण्याचे कार्य केले आहे.

शाखेच्या विविध उपक्रमांना सातत्याने अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा मसाप, पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

           शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक नीलकंठ सोनवणे व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनश्याम अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शाखेचे उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पं. पाटील, कार्यवाह संजय बारी, गौरव महाले, कोषाध्यक्ष योगेश चौधरी, श्रीकांत नेवे व कार्यकारणी सदस्य शाखेच्या सदस्यांच्या मदतीने सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. उत्कृष्ट शाखा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मसाप शाखेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज