श्री बालाजी महाराजांचा आजपासून वहनोत्सव दि. 3 ऑक्टोबर रोजी रथयात्रा.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/09/2025

श्री बालाजी महाराजांचा आजपासून वहनोत्सव दि. 3 ऑक्टोबर रोजी रथयात्रा....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         श्री बालाजी महाराजांचा आजपासून वहनोत्सव दि. 3 ऑक्टोबर रोजी रथयात्रा....

         चोपडा येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानाचा सुमारे 350 ते 400 वर्षांची परंपरा असून शारदीय नवरात्री उत्सवा निम्मिताने सालाबादा नुसार वहनोत्सव व रथयात्रा उत्सव दि. 22 सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान चोपडा शहरात साजरा होणार आहे. या वहनोत्सव व रथयात्रेची तयारी पूर्णत्वास आली असल्याची माहिती श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या विश्वस्थानी दिली.

         आज दि. 22 घटस्थापणे पासून वहनोत्सव सुरु होत असून रोज शहरातील वेगवेगळ्या भागात श्री बालाजी महाराजांचे वहन वाद्यांच्या गजरात भक्तांच्या भेटीला जाते. व भक्त ठिकठिकाणी या वहनाची आरती करून जल्लोष्यात स्वागत करतात.
         वहनोत्सवानिमित्त वहनाची दररोज विधिवत पूजेनंतर रात्री 9 वाजेनंतर मंदिरापासून सुरुवात होऊन दि. 22 सप्टेंबर रोजी हत्तीचे वहन गांधी चौक , बाजारपेठेत जाईल , दि. 23 सप्टेंबर रोजी सिंहाचे वहन मोठा देव्हारा , गणेश कॉलनी या भागात जाईल , दि. 24 सप्टेंबर रोजी बत्तीस पुतळीचे वहन अरुणनगर , श्रीराम नगर या भागात जाणार आहे , दि. 25 सप्टेंबर रोजी गरुडाचे वहन गुजर अळी येथे जाईल , दि. 26 सप्टेंबर रोजी नागोबाचे वहन सुंदरगढीत जाईल , दि. 27 सप्टेंबर रोजी मारोतीचे वहन जबरेराम मंदिर , भाटगल्लीया भागात जाईल , दि. 28 सप्टेंबर रोजी सूर्याचे वहन बडगुजर गल्लीत जाईल , दि. 29 सप्टेंबर रोजी चंद्राचे वहन पाटील गढी , मल्हारपुरा या भागात जाणार आहे , दि. 30 सप्टेंबर रोजी वाघाचे वहन गुजराथी गल्लीत जाईल , दि. 1ऑक्टोबर रोजी मोराचे वहन रथगल्ली , बाजारपेठ या भागात जाणार आहे , दि. 2  ऑक्टोबर रोजी घोड्याचे वहन चौधरी वाडा , जैन गल्ली या भागात जाईल.
          तसेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी चोपडा शहरात दोन दिवसाची रथयात्रा भरते. त्यानिम्मिताने शहरातील व पंचक्रोशीतील या नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी रथोत्सव 3 व 4 ऑक्टोबरला होणार आहे. दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गोल मंदिरा जवळील श्री बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथयात्रेला सुरुवात होईल. आशा टॉकीज , चोपड्याचे ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर समोरून रथ मागनि रथ पाटील दरवाजा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी मुक्कामी राहिल. तसेच तेथून दुसऱ्या दिवशी दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात होऊन शनिमंदिर समोरून बाजारपेठ मार्गे पुन्हा गोल मंदिराजवळ येवून रथयात्रा संपते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp