चोपडा (प्रतिनिधी) : - -
वडती ता.चोपडा येथील रेशन माफियाच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करून त्याची चौकशी व्हावी ; वडती ग्रामस्थांची मागणी
वडती ता.चोपडा गावाच्या रहिवाशांनी चोपडा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन सादर करून मागणी केली कि त्यांच्या वडती गावातील रेशन दुकान हे गेल्या 4 ते 5 वर्षापासून वैष्णवी स्वय सहाय्यता महिला बचत गट वडती यांना चालवण्याचा परवाना मिळाला आहे. सदर गट हा नाममात्र असुन हे रेशन दुकान, वडती गावातील रेशन माफीया शिवाजी सोनु धनगर व त्यांची पत्नी प्रतिभा शिवाजी धनगर हे चालवत आहेत. अशी वडती येथील गावाकऱ्यांनी तक्रारी केली आहे.
सदर बचत गटात एकाच कुटुंबातील 2 ते 3 महिला असुन तेच दुकान चालवत आहे. इतर महिला सदस्यांना या रेशन दुकाना बाबतचा कोणत्याही प्रकारचा आर्थीक व्यवहाराचे माहित नसुन आजपर्यंत एक रुपयाही आर्थीक लाभ या बचत गट सदस्यांना मिळाला नाही. फक्त अनेक वर्षापासुन रेशन दुकानावर काम करणारे शिवाजी धनगर व त्याची पत्नी प्रतिभा धनगर हेच पती पत्नी रेशन दुकान चालवत आहेत, तेच मालक आहेत, गटाचा काहीच संबंध नाही असे तमाम पंचक्रोशीतील नागरीकांच्या निर्दशनास आले आहे.
सदर दुकानाचा परवाना मिळवतांना सदर बचत गटाची कुठलीही नियमीत बचत नाही, पंचसुत्रींचे पालन नाही, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना हाताशी धरून खोटा अहवाल तयार करुन लबाडीने रेशन दुकान परवाना मिळवला आहे याची चौकशी व्हावी.
या रेशन दुकानात गरजु लाभार्थ्यांना अन्न धान्य व रेशन तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. व गरीब व गरजु यांना वंचीत ठेवले जात आहे. या रेशन दुकानांच्या बाहेर कुठलेही भाव फलक व सुचना फलक नाही.
लाभार्थीना मालाची, धान्याची कुठलीही पावती देत नाही, तसेच शासनाच्या निकषानुसार योग्य प्रमाणात धान्य दिले जात नाही, रेशन दुकानदार वेळेवर धान्य वाटत नाही महिन्यातून फक्त 2 दिवस धान्य वाटप करून दुकान बंद ठेवले जाते, शासनाच्या योजने नुसार धान्य मोफत मिळत असूनही बहुतेक लाभार्थ्यांकडुन 150 ते 200 रुपये घेतले जात असून किती धान्य मंजूर आहे व लाभार्थीला किती धान्य दिले त्याची पावती दिली जात नाही.
नागरीकांना शासनाच्या योजने नुसार योग्य प्रमाणात धान्य दिले जात नाही. व धन्यांची गुणवत्ता निकृष्ठदर्जाची असते, शासनाच्या निकषानुसार दुकानासाठी मंजूर धान्य दुकानात (गावात) योग्य प्रमाणात न येता त्याधान्याची परस्पर काळ्याबाजारात विल्हेवाट लावली जाते. व एक महिन्या आड अन्न धान्य वाटप होते, या रेशन दुकानात तक्रार नोंद वही नाही, आवश्यक माहिती प्रकाशीत व प्रदर्शीत केलेली नाही, या रेशन दुकानाची सखोल चौकशी केली असता खुप मोठा गैरव्यवहार उजेडात येईल असे गावाकऱ्यांचे म्हणणे आहे.
सदर रेशन दुकान नाममात्र गटाच्या नावाने असुन चालक मालक शिवाजी धनगर व त्याची पत्नी प्रतिभा धनगर हे असून यांची व बचत गटांची आर्थीक चौकशी व्हावी, हे रेशन दुकान खोटी व दिशाभुल कागदपत्र जोडुन मिळविले आहे. वैष्णवी गटाच्या महिलांना आता पर्यंत या दुकानातून कुठल्याच प्रकारचा आर्थीक लाभ होत नाही व मिळालाही नाही. फक्त एकच व्यक्ती शिवाजी धनगर व त्याची पत्नी प्रतिभा धनगर हे लाभ घेत आहेत.
वडती गावातील गावकरी या दुकानाचे लाभार्थी या दुकानदाराला जाब विचारण्यासाठी गेले असता दुकान चालकाने अतिशय बेजवाबदार पणे उत्तरे देत तुमच्याने जे होईल ते करून टाका माझी वर पर्यंत पोच आहे. मी हप्ते पुरवत असल्याने माझे कोणीच काही करु शकत नाही. असे उत्तरे देतो असे गावाकऱ्यांचे म्हणणे आहे.
वडती गावातील रहिवाशांनी गेल्या 6 महिन्यात सदर दुकानाची पुरवठा विभागात वेळोवेळी तक्रार केली असता अध्यपावेतो कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही असे गावातील लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. सदर गटाच्या नावाखाली रेशन दुकान चालवणाऱ्या गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्ती शिवाजी धनगर व रेशन दुकानात होत असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून सदर दुकानाचा परवाना रद्द करावा अशी समस्त वडती गावातील ग्रामस्थानी मागणी केली आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment