पंकज बालसंस्कार केंद्रात पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/09/2025

पंकज बालसंस्कार केंद्रात पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न....

 
 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          पंकज बालसंस्कार केंद्रात पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न....

        पंकज बालसंस्कार केंद्र, चोपडा येथे पालक-शिक्षक सभेचे औचित्यपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर भर देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

         सभेचा मुख्य उद्देश कृतीयुक्त शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण ज्ञान, चारित्र्य व कौशल्यांचा विकास घडविणे हा होता. शालेय स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत पालकांना माहिती मिळावी तसेच त्यांच्या सूचना शैक्षणिक प्रगतीसाठी उपयोगी पडाव्यात, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

          अध्यक्षस्थानावर डॉ. राहुल पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात शाळेतील शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी विज्ञान, क्रीडा व कलाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी विद्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. विभाग प्रमुख सौ. मीना माळी यांनी कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालकांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन केले. सौ. भावना दीक्षित यांनी अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नृत्य, संगीत, चित्रकला व क्रीडा संधींची माहिती दिली.

         मुख्याध्यापक  एम. व्ही. पाटील यांनी पालकांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थ्यांनी पुस्तकापुरते मर्यादित न राहता कला, शारीरिक शिक्षण, नाटक व सर्जनशील लेखन यांसारखी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. शाळेत उपलब्ध असलेल्या आधुनिक शैक्षणिक साधनसामग्रीची माहितीही त्यांनी पालकांना दिली.
           कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी श्लोक, प्रार्थना, गाणी, गोष्टी तसेच विविध प्रात्यक्षिके सादर करून पालकांची वाहवा मिळवली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता व सादरीकरण कौशल्याचा उत्तम प्रत्यय उपस्थितांना आला.

          सभेला एकूण 280 पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. पालक प्रतिनिधी रोहन जोशी, रणछोड पाटील व विजयानंद शिंदे यांनी शाळेच्या शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम व सुविधांविषयी समाधान व्यक्त करून शाळेच्या उपक्रमांना भविष्यात सक्रीय पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगिता कोळी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती छाया बारी यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp