लोक अदालतीत नगरपालिकेच्या थकीत वसुलीला चालना..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/09/2025

लोक अदालतीत नगरपालिकेच्या थकीत वसुलीला चालना.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         लोक अदालतीत नगरपालिकेच्या थकीत वसुलीला चालना.....

        दिवाणी व फौजदारी न्यायालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.13 सप्टेंबर 2025 रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत चोपडा नगरपरिषदेच्या थकीत रकमेबाबत असलेली प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली.

         या लोकअदालतीत नगरपालिकेच्या वतीने एकूण 29  प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यातून एकूण 37,51,951/- रुपये एवढी थकीत रक्कम तडजोडी अंती वसूल करण्यात आली. सुट व तडजोडीची प्रक्रिया न्यायाधीश श्री. शिगोकर यांच्या कोर्टात पूर्ण करण्यात आली.
          या उपक्रमासाठी लोक अदालतीत मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या वतीने उपमुख्याधिकारी श्री. संदीप गायकवाड , मिळकत व्यवस्थापक श्री. संजय धमाळ , लिपिक श्री. प्रफुल बोंडे , लिपिक श्री. पंकज बाविस्कर , ऑपरेटर श्री. मुकेश सूर्यवंशी , मदतनिस श्री. मनोहर माळी इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

         लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनामुळे थकीत रकमेच्या वसुलीस चालना मिळाली असून नागरिक आणि प्रशासन यांचा समन्वय वृद्धिंगत झाला आहे. तसेच गाळेधारकांनी मिळालेल्या सूटसह सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांचे आभार मानले.

          तसेच यासोबतच, येत्या 25 सप्टेंबर 2025 रोजी नगरपरिषद नाट्यगृह, चोपडा येथे लोकसेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर लोकसेवा पंधरवड्यासाठी आमदार महोदय स्वतः उपस्थित राहणार आहेत. तरी, सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp