महिला मंडळ शाळेत बाल दिवस उत्साहात साजरा..... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/11/2025

महिला मंडळ शाळेत बाल दिवस उत्साहात साजरा.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          महिला मंडळ शाळेत बाल दिवस उत्साहात साजरा.....

          चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात बाल दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत दिवसभर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी बाल दिवसाचा आनंद लुटला.

         भारताचे प्रथम पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या बाल दिवसानिमित्त महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी गोणपाट स्पर्धा, जोडीमध्ये फुगे फोडणे स्पर्धा यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होत मनसोक्त आनंद लुटला. तसेच याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्याचा परिचय आपल्या वक्तृत्वातून करून दिला. यावेळी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  

           याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील, शिक्षक संजय बारी, चंद्रकांत चौधरी, अनिल महाजन, भावेश लोहार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला माळी यांनी केले. तर स्पर्धा आयोजनात संजय सोनवणे, प्रशांत चव्हाण, वनराज महाले, कविता पाटील, सागर चौधरी, विजय पाटील, योगेश शिरसाठ, श्रावण भालकर हे सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज