चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ; मानस महेंद्र भोळे याला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2025 मध्ये राष्ट्रीय विजेतेपद..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/12/2025

चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ; मानस महेंद्र भोळे याला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2025 मध्ये राष्ट्रीय विजेतेपद.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपड्याच्या शिरपेचात मनाचा तुरा ; मानस महेंद्र भोळे याला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2025 मध्ये राष्ट्रीय विजेतेपद.....

          भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या देशातील सर्वांत प्रतिष्ठित व मानाची नवोपक्रम स्पर्धा स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) 2025 च्या ग्रँड फायनलमध्ये चोपड्याचा सुपुत्र मानस महेंद्र भोळे याने राष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान यश संपादन करत विजेतेपद पटकावले आहे. या यशामुळे चोपड्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, संपूर्ण तालुक्यातून मानसवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

        संपूर्ण भारतातून नवोपक्रमशील व प्रतिभावान युवकांनी सहभाग घेतलेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेची उपांत्य फेरी मुंबई येथे, तर अंतिम फेरी कानपूर (उत्तर प्रदेश) येथे पार पडली. या दोन्ही फेऱ्यांमध्ये मानस भोळे याने आपल्या सहकाऱ्यांसह उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, नाविन्यपूर्ण कल्पनाशक्ती आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. मानस भोळे याच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतातून तब्बल 380 संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मानसच्या संघाने देशात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या संघाला ₹ 1,50,000/- रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
         स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ही स्पर्धा देशातील तरुणांमध्ये नवोपक्रम, संशोधन आणि विविध समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते. 36 तासांच्या कठोर परिश्रमातून, योग्य जेवण व झोपेची तमा न बाळगता, संघाने उत्कृष्ट उपाय सादर करत हा विजय मिळवला.

         या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य अविनाश सिंग चौहान, PSIT गट संचालक प्रा. डॉ. मनमोहन शुक्ला, तसेच AICTE उपसंचालक डॉ. प्रशांत कुमार खरात, विनायक पचलग आणि संचालक प्रा. डॉ. राघवेंद्र सिंह यांच्या हस्ते विजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला. विविध मंत्रालयांतील ज्युरी सदस्यांनी यंदा विद्यार्थ्यांनी समस्यांकडे नवीन दृष्टिकोनातून पाहत नाविन्यपूर्ण उपाय सादर केल्याचे नमूद केले. डॉ. मनमोहन शुक्ला यांनी स्पष्ट केले की, ज्युरीने एकूण चार टप्प्यांतील मूल्यांकनावर आधारित गुणांकन केले. कार्यक्रमादरम्यान संस्थेत नावीन्य, तंत्रज्ञान आणि तरुणाईच्या ऊर्जेचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले. यावेळी डॉ.विशाल नागर, डॉ.रघुराज सिंह सूर्यवंशी, डॉ.आरती सक्सेना आणि डॉ.सुमित चंद्रा उपस्थित होते.

         मानस महेंद्र भोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ‘Team Visioncraft’ या संघाने Real-Time AI/ML-Based Phishing Detection and Prevention System या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये उत्कृष्ट उपाय सादर करत विजेतेपद पटकावले.

        मानसच्या या घवघवीत यशाबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले तसेच विद्यमान अध्यक्ष पंकज बोरोले यांनी विशेष अभिनंदन केले आहे. चोपड्याच्या भूमीने पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केल्याचे हे यश तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp