चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतमोजणी प्रक्रिया जाहीर...
मतमोजणीचे ठिकाण
चोपडा नगरपरिषदेच्या जुनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील मिटींग हॉल (चोपडा शहर उपजिवीका केंद्र)
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व उमेदवारांनी निश्चित करुन दिलेले मतमोजणी प्रतिनिधी (विहित ओळखपत्र असणारे) यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल.
मतमोजणीची तारीख व वेळ
दि.21/12/2025 रोजी सकाळी 10:00 वा.
मतमोजणी सुरक्षा व्यवस्था
मतमोजणी परिसरात पोलीस व विशेष सुरक्षा पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनधिकृत प्रवेशास सक्त मनाई आहे.
उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी व्यवस्था
उमेदवारांच्या प्रभागाच्या प्रतिनिधींसाठी परिसरात प्रतीक्षा कक्ष स्थापन केला आहे. प्रभागनिहाय प्रतीक्षा कक्षातील प्रतिनिधीना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाईल.
मतमोजणी प्रक्रिया
प्रभागनिहाय मतमोजणी करतांना सर्व प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु करण्यात येईल. सुरक्षा कक्षातून EVM मशीन काढणेकामी सुरक्षा कक्ष अधिकारी व उमेदवार प्रतिनिधी यांची उपस्थितीत उघडण्यात येईल.
मतमोजणी फेरीनिहाय / प्रभागनिहाय केली जाईल. उमेदवारांच्या प्रतिनिधींना संबंधित टेवल जवळ उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
मतमोजणी नियोजन प्रथम सकाळी 10:00 वा. टपाली मतपत्रिकांची मतमोजणीस सुरुवात होईल. फेरीनिहाय ओळखपत्रा आधारे मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल. फेरीनिहाय वेळ ही अंदाजे नमूद केली आहे. यामध्ये होणारा बदल उद्घोषणाव्दारे कळविण्यात येईल.
निकाल जाहीर
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात येईल. अंतिम निकालाची माहिती नगरपरिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत माध्यमांव्दारे प्रसिध्द केली जाईल.
सर्व उमेदवार, प्रतिनिधी व नागरिकांनी मतमोजणी दरम्यान नियमांचे पालन करावे व शांतता राखण्याचे आवाहन करणेत येत आहे. मतमोजणी केंद्र व परिसरात मोबाईल, लॅपटॉप तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास मनाई आहे. सर्व उमेदवार, प्रतिनिधी व नागरिकांनी मतमोजणी दरम्यान नियमांचे पालन करावे व शांतता राखण्याचे आवाहन मनिषकुमार गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी व रामनिवास झवर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी न. पा. चोपडा यांनी केले आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment