चोपडा (प्रतिनिधी) : - -
"आजच्या वाहवत चाललेल्या काळाला बुद्धी आणि अनुभव असलेले ज्येष्ठ वठणीवर आणू शकतात " - न. प. मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे प्रतिपादन...!
आज तुम्ही आम्ही ज्या विकासाच्या गोष्टी करतोय त्या विकासात माणुसकी कुठे गेली आहे ? असा प्रश्न उपस्थित करत वरील शब्दांत ज्येष्ठांच्या बुद्धी आणि अनुभवाचे महत्त्व फेस्कॉम अर्थात ज्येष्ठ नागरिक संघांच्या महासंघाच्या 45 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी न.प. नूतन युवा मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडाच्या कार्यालयात आज ज्येष्ठ नागरिक महासंघ महाराष्ट्र (फेस्कॉम) यांच्या 45 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले. जेष्ठ नागरिक संघ चोपडाचे अध्यक्ष श्री जयदेव देशमुख यांच्या हस्ते फेस्कॉमचे संस्थापक कै राधाकृष्ण भट यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व खरा तो एकची धर्म प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी प्रमुख अतिथी न.प. चोपडाचे नूतन मुख्याधिकारी झंवर यांचा शॉल पुष्प गुच्छ देऊन फेस्कॉमचे खानदेश प्रादेशिक विभाग पश्चिमचे समन्वयक / चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री. विजय करोडपती यांनी तर शहराचे आरोग्य दूत डॉ .विकास हरताळकर यांचे स्वागत संघ अध्यक्ष श्री.जयदेव देशमुख यांनी केले.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात विजय करोडपती यांनी फेस्कॉम ची स्थापना, वाटचाल, फेस्कॉमने ज्येष्ठांसाठी केलेले काम, शासन दरबारच्या मागण्या याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच आज कोणांकडेच वेळ नसलेल्या गतिमान काळात ज्येष्ठांनी भावनेच्या भरात वाहून न जाता, आज महाराष्ट्रातच सर्वात जास्त मुलं ज्येष्ठ आई बापांना वागवित नसल्याच्या 6500 तक्रारी आहेत , तेव्हा ज्येष्ठांनी स्वतः ला ओळखा व स्वतःही सक्षम रहा असं समर्पक उदाहरणं, कविता यांद्वारे आवाहन केल.
कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन फेस्कॉम तालुका सचिव श्री. शांताराम जे. पाटील यांनी केले तर आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव विलास पाटील यांनी मानलेत. या फेस्कॉम च्या 45 व्या वर्धापन दिन कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष जे. एस.नेरपगारे, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील, सचिव सहसचिव विलास पाटील, फेस्कॉम जिल्हा संघटक श्री. प्रमोद डोंगरे, प्रा.श्याम गुजराथी, श्री.गोविंदा बापू महाजन, श्री.राजेंद्र साळुंखे, श्री.रमेश शिंदे एन.डी. महाजन आजी माजी पदाधिकारी - संचालकासह संघाचे अनेक सदस्य यांची उपस्थिती होती.
WhatsApp
No comments:
Post a Comment