पूज्य साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/12/2025

पूज्य साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी.....

 

वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) : - -

         पूज्य साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी.....

         पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती येथे साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या रोप्य महोत्सवी वर्षाची सांगता समारंभाच्या निमित्ताने दिनांक 24 डिसेंबर 2025 बुधवार रोजी साने गुरुजी जयंती चे अवचित्य साधून करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थीनींनी इशस्तवन व स्वागतगित म्हटले मान्यवरांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते प्राध्यापक सचिन देवरे सुप्रसिद्ध शिवव्याख्यानकार यांनी "चला साने गुरुजी होऊ" या  विषयावर व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना व आलेल्या सर्व श्रोत्यांना मातृ हृदयी साने गुरुजींची विविध उदाहरणे देऊन मंत्रमुग्ध केले.

         या कार्यक्रमासाठी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री डी बी पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष श्री मनोज चित्रकथी शाळेच्या संचालिका श्रीमती पुष्प हरी जोशी नगरपालिका चोपडाचे प्रकल्प अधिकारी गणेश पाठक, वडती गावाचे सरपंच देविदास धनगर तसेच विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे चोपडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, बालमोहन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा पाटील मॅडम तसेच सनपूले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मंगेश चौधरी, माजी मुख्याध्यापक एल एच पाटील उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय शाळेचे मुख्याध्यापक संजय हरी जोशी यांनी केले. सूत्रसंचालन अतुल धनगर यांनी केले कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व विभागातील कर्मचारी तसेच विष्णापूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, ग्रामस्थ माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जगदिश पाठक यांनी केले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अतुल चव्हाण, चेतन पाटील, राजेश चौधरी, प्रशांत गुरव, रवींद्र पाटील, विजय पालीवाल, विनोद धनगर, शिक्षकेतर कर्मचारी विजय दिक्षीत, लीलाधर महाजन, कैलास सुतार यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp