चोपडा (प्रतिनिधी) : - -
शिक्षण देणारी संस्था संस्कारशील असेल तर माणूस संस्कारमय होतो , माणसाचा शिक्षक संस्कारी असेल तर माणूस चांगला होतो ~ डॉ.सुनीलकुमार लवटे
विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र चोपडा संचालित विवेकानंद विद्यालयात आयोजित शिक्षण चिंतन परिषदेत बोलतांना डॉ.सुनिलकुमार लवटे म्हणाले की, शिक्षण देणारी संस्था संस्कारशील असेल तर माणूस संस्कारमय होतो, माणसाचा शिक्षक संस्कारी असेल तर माणूस चांगला होतो. शिक्षण चांगले होण्यासाठी शिक्षण व्यवस्था निर्माण झाली. आता मात्र हळूहळू शिक्षण व्यवस्था ही खिळखिळी झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आणीबाणीचा अपवाद सोडला तर इंदिरा गांधी कर्तृत्ववान पंतप्रधान होत्या. पुरुष नव्हे तर स्री देखील कर्तृत्वान असते हे त्यांनी पंतप्रधान असतांना दाखवून दिले. गांधी पासून ते मोदी पर्यंत पंतप्रधान यांनी देश हिताचेच कामं केली. महात्मा गांधींचा प्रभाव आजही शिक्षणावर आहे. शिक्षण माणसाला बोध देते. शिक्षण काय देतं तर जीवनाला आकार देत. शिक्षण काय देतं तर जीवनाला आकार देत, आणि आज तेच नेमकं मिळत नाही असे डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी बोलतांना सांगितले. आज स्पर्धा परीक्षेकडे मुले जास्त जातांना दिसतात. शिक्षक होण्यासाठी पुढे येत नाहीत. त्याचे कारण म्हणजे आज शिक्षण संस्था बदलल्या आहेत. शिक्षक भरतीसाठी 25 ते 30 ₹ लाख द्यावे लागतात म्हणून मुले स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसतात. ब्रिटिश गेले पण आपल्याकडे काय काय ठेवून गेले हे न सांगितलेले बरे. मुलांना माणूस बनवा घोडा नाही. आश्वासन द्यायचे व पाळायचे नाही हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आज विद्यालयात मुले प्रवेश नाही घेत तर पालक प्रवेश घेतात. शिक्षण व्यवस्था आज टक्केवारी वर आल्याने गोंधळ उडाला आहे. मुले नापास झाली पाहिजेत, नापास होणारे मोठे होतात हा इतिहास आहे.कारण ठेच लागल्यानंतर माणूस घडतो. आज वर्तमानात शिक्षण सगळ्यात महाग आहे. शिक्षणामुळे जग बदलतं यात दुमत नाही. माणूस माणूस असतो हे शिक्षणाने समजून घेतलं पाहिजे असे विचार “व्यवस्था आहे पण शिक्षण नाही” या विषयावर बोलतांना कोल्हापूर येथील व्याख्याते डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी यावेळी मांडले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, डॉ जयंत पाटील, माधुरी मयुर, चंद्रहासभाई गुजराथी, मुख्याध्यापक नरेंद्र भावे , डॉ.नीता हरताळकर यांची उपस्थिती होती.
WhatsApp
No comments:
Post a Comment