महाशिवरात्री निमित्त 18 फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारले महाशिवलिंग.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...
ताज्या बातम्या
मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)    |    बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288    |    निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा S Maharashtra 7 News...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/02/2026

महाशिवरात्री निमित्त 18 फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारले महाशिवलिंग....


चोपडा (प्रतिनिधी) : - -

         महाशिवरात्री निमित्त 18 फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारले महाशिवलिंग..... 

        महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो. सृष्टीचे रचयिता, सर्व आत्म्यांचे परमपिता, निराकार परमात्मा शिव यांच्या अवतरणाचा हा स्मरणदिन असल्याची आध्यात्मिक मान्यता आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंध:कारातून प्रकाशाकडे आणि अशांततेतून शांततेकडे नेणारा हा पर्व मानवी जीवनात आत्मचिंतन, संयम, पवित्रता आणि सद्भावना जागृत करणारा आहे. उपवास, जप, तप, ध्यान आणि रुद्राभिषेक यांसारख्या धार्मिक कृतींबरोबरच आत्मशुद्धी व सद्गुणांचा स्वीकार करण्याचा संदेशही या दिवशी दिला जातो.

        याच महत्त्वपूर्ण पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, चोपडा यांच्या वतीने एक आगळावेगळा आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रथमच 18 फूट उंच व 21,111 (एकवीस हजार एकशे अकरा) कच्च्या केळ्यांपासून साकारलेले भव्य महाशिवलिंग दर्शनासाठी सजविण्यात आले असून, हा उपक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पर्यावरणपूरक आणि सर्जनशील पद्धतीने साकारलेले हे महाशिवलिंग भक्तांच्या श्रद्धेला नवचैतन्य देणारे ठरत आहे.

        या निमित्ताने प्रभू चिंतन भवन, ओम शांतीनगर, यावल रोड, चोपडा येथे 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता व रात्री ७ वाजता आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमा दरम्यान आध्यात्मिक चित्रप्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले असून, त्यातून शिवतत्त्वाचे गूढ, आत्मा-परमात्म्याचे नाते, तसेच सदाचारयुक्त जीवनाची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे.

        आयोजकांनी नागरिकांना सहपरिवार उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व परमात्म्याचा दिव्य संदेश समजून घ्यावा, असे आवाहन केले आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चोपडा शहरात साकारलेला हा अनोखा उपक्रम भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp