“मोबाईल सोडा, मैदानी खेळांत रममाण व्हा” — हिवाळी क्रीडा स्पर्धेत एम. व्ही. पाटील यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/02/2026

“मोबाईल सोडा, मैदानी खेळांत रममाण व्हा” — हिवाळी क्रीडा स्पर्धेत एम. व्ही. पाटील यांचे प्रतिपादन


चोपडा (प्रतिनिधी) : - -

         “ मोबाईल सोडा, मैदानी खेळांत रममाण व्हा ” —  हिवाळी क्रीडा स्पर्धेत एम. व्ही. पाटील यांचे प्रतिपादन

         पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित, पंकज बालसंस्कार केंद्रात गुरुवार 12 फेब्रुवारी 2026 रोजी हिवाळी क्रीडा स्पर्धांचा रंगतदार व उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षस्थानी असलेले मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील  व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभाग प्रमुख मीना माळी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यासासोबत खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री महाजन यांनी केले. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी धावणे, संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे, बॅलेंसिंग अशा विविध रोमांचक खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धेत मुलांचा जोश, चिकाटी आणि खेळाडूवृत्ती विशेष लक्षवेधी ठरली. संपूर्ण परिसरात आनंद, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
        अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील  यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत “मोबाईलचा अतिरेक टाळून मैदानी खेळ, योगासन, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणेकडे वळणे आवश्यक आहे,” असे मार्गदर्शन केले. सर्वांगीण विकासासाठी शारीरिक, मानसिक व बौद्धिक सुदृढता महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या हिवाळी क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, आत्मविश्वास आणि उत्साह दुणावल्याचे चित्र पाहायला मिळाले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनीही कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp