पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/02/2026

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

         “विज्ञान ही केवळ ज्ञानाची शृंखला नसून विचार करण्याची एक पद्धत आहे,” या ख्यातनाम शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांच्या विचाराला अनुसरून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल, चोपडा येथे मंगळवार, दि.10 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनी उत्साहात पार पडली. या विज्ञान प्रदर्शनीत प्री-प्रायमरी ते इयत्ता 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, भाषा, कला आणि सर्जनशीलता या विविध क्षेत्रांतील प्रकल्प सादर करून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता व अभ्यासपूर्ण तयारी प्रभावीपणे मांडली. उपस्थित पालक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

         प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण ठरले ते 20 रोबोटिक्स प्रकल्प आणि 17 कोडिंग प्रकल्प. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. संगणक विभागात एम.एस. वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल आदी अनुप्रयोगांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांच्या चित्रकला व हस्तकला स्टॉल्सनी विशेष लक्ष वेधून घेतले.

         भाषा व गणित विषयांवरील शैक्षणिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक सादर केले. कार्यक्रमाला कलात्मक स्पर्श देण्यासाठी  संगीत शिक्षक नितीन वाल्हे  यांनी प्रेरणादायी संगीत सादर करून वातावरण अधिक आनंदमय केले. सकाळी 9:30 वाजता संस्थेचे अध्यक्ष  पंकज बोरोले  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोलें, उपाध्यक्ष अविनाश राणे, प्राचार्य मिलिंद पाटील, समन्वयक शारदा मॅडम व उपमा जैस्वाल उपस्थित होते.

         कार्यक्रमास डॉ. दुर्गेश जैस्वाल, डॉ. राहुल पाटील, डॉ. पराग पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. सचिन कोल्हे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अक्षय पाटील, डॉ. आनंद जाखटे, डॉ. जागृती सुराणा तसेच सचिन पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. डॉ. रोशनी पाटील यांनी वसतिगृहात विशेष वैद्यकीय जनजागृती सत्र घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कार्यक्रम प्रभारी स्वाती पाटील, ममता चौधरी , शुभांगी पाटील  तसेच सर्व शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

         विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांचा मनापासूनचा प्रतिसाद, विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रभावी मांडणी आणि कला-संगीताचा सुंदर संगम यामुळे ही विज्ञान प्रदर्शनी भव्य, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp