जागतिक चिमणी दिनानिमित्त 20 मार्च रोजी चोपड्यात मोफत जलपात्र वाटप ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/03/2026

जागतिक चिमणी दिनानिमित्त 20 मार्च रोजी चोपड्यात मोफत जलपात्र वाटप ...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          जागतिक चिमणी दिनानिमित्त 20 मार्च रोजी चोपड्यात मोफत जलपात्र वाटप ...

         चोपडा शहर परिसरातील कमी होत जाणारी हिरवळ , वृक्षतोड , मोबाईल टॉवरच्या लहरी , घातक प्रदूषण , पिकांवरील अतिघातक रसायनांची फवारणी , नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास , काँक्रीट इमारतींचे बांधकाम , ऋतुचक्रातील बदल इ. सारख्या अनेक कारणांनी चिमणी व परिसरातील सामान्य पक्ष्यांची संख्या गेल्या दोन - तीन दशकांपेक्षा जास्त कालावधी पासून रोडावत चालली आहे. पक्षी हे निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक व वसुंधरेचे बोलके अलंकार आहेत. त्यांचे संवर्धन व संरक्षण खूप महत्त्वाचे आहे , या विचाराने नागरिकांना मार्गदर्शन करत हेमराज पाटील (प्रमुख - सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था) यांनी श्री स्वामी समर्थ महाराज मठ , शिंदे वाडा आणि श्रीराम मंदिर , गांधी चौक चोपडा या ठिकाणी उपस्थित भाविकांना जागतिक चिमणी दिन व वन दिन निमित्त 101 पेक्षा अधिक मातीचे जलपात्र मोफत वितरित केले. मोफत जलपात्र वितरणाचा कृती कार्यक्रम यशस्वीरित्या अखंडितपणे सुरू असल्याचे हे बारावे वर्ष आहे. तसेच उन्हाळ्यात अजून जलपात्र वितरणाचे निसर्ग सेवा कार्य सुरू राहणार आहे.
        या प्रबोधनपर कृती कार्यक्रमाच्या प्रसंगी परिसरात आढळून येणारे सामान्य पक्षी व चिमण्यांची माहिती , त्यांची दिनचर्या व निसर्ग साखळीतील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. जनजागृती करणारे छापील माहिती पत्रके देण्यात आले. जलपात्र तसेच पर्यावरण पूरक घरटे लावण्यासंबंधी उपस्थित भाविकांना आग्रह केला. तप्त उन्हाने डीहायड्रेट झालेले पक्षी अथवा असहाय्य जखमी पक्षी आढळल्यास मदतीसाठी सातपुडा टीमला 9922085434 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित भाविक बंधू-भगिनींनी पक्षी संवर्धनासाठी केलेल्या आवाहनाला कृती करून पूर्णतः मदत करण्याचा दृढ संकल्प आपल्या प्रतिक्रियांमधून दिला.
         उपक्रम यशस्वीतेसाठी मंदिरांचे पुजारी पुरुषोत्तम एकडीकर महाराज , भूषण देवळे महाराज , सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे अश्विनी पाटील , घनश्याम वैद्य , योगेश देवराज , अमोल डूडवे , आर्यदीप पाटील , अश्फाक पिंजारी , राहुल महाजन , नंदिनी कुंभार , कृष्णप्रिया पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp