थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू ; चोपडा नगर परिषदेची धडक कारवाई - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/03/2026

थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू ; चोपडा नगर परिषदेची धडक कारवाई

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू ; चोपडा नगर परिषदेची धडक कारवाई 

        चोपडा नगरपरिषद​ प्रशासनाने थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील बारी वाडा, पाटील गढी, चुनार अळी आणि मल्हारपुरा यांसारख्या प्रमुख भागांमध्ये धडक मोहीम राबवत तब्बल 30 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

         व्यावसायिक गाळ्यांवरही सीलची कारवाई

         या मोहिमेत ​केवळ नळ कनेक्शनच नव्हे, तर व्यावसायिक मालमत्तांवरही प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. लायब्ररी शॉपिंग सेंटर आणि छत्रपती शाहू महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एकूण  10 गाळे सील करण्यात आले आहेत. ज्या थकबाकीदारांनी एक दिवसाची मुदत मागितली, त्यांना शेवटची संधी म्हणून वेळ देण्यात आला आहे.
          🔹 या कारवाईत सहभागी अधिकारी  🔹

         या धडक मोहिमेत उपमुख्याधिकारी संजय मिसर, वरिष्ठ लिपिक अनिल चौधरी, लिपिक चेतन त्रिभुवन, मिळकत व्यवस्थापक महेश जोशी, लिपिक पंकज बाविस्कर, शिपाई गुलाबवाडे आणि मदतनीस मनोहर माळी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.

        🔴 रामनिवास झंवर, मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांचे आवाहन 🔴

      मुख्याधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ​"अभय योजनेची अधिकृत मुदत संपलेली असूनही, नागरिकांच्या फायद्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करून ही संधी उपलब्ध करून दिली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात थकबाकीदारांवर यापेक्षा मोठी आणि कठोर कारवाई केली जाईल, आणि तेव्हा कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी त्वरित कर भरणा करावा."
                @  या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये  @

               🔹 सुटीच्या दिवशीही सेवा सुरू  🔹

        या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही नगर परिषदेचा वसुली विभाग कर भरणा स्वीकारण्यासाठी 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात आला आहे.

                🔴 नागरिकांचा मोठा प्रतिसाद 🔴

        सध्या वसुली विभागात कर भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून, लोकांमध्ये 'अभय योजने'चा लाभ घेण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे.

                        🔹  शेवटची संधी  🔹    

        योजनेचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत. दंडमाफीचा लाभ घेऊन सन्मानाने आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp