चोपडा शहरात प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न - - जनगणना ~ 2027 - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/04/2026

चोपडा शहरात प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न - - जनगणना ~ 2027

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा शहरात प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न - - 

जनगणना ~ 2027

          भारतीय जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी (घर गणना) चोपडा शहरात जय्यत तयारी सुरू असून 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. चोपडा नगरपरिषदेचे सभागृह, नाट्यगृह आणि जुन्या इमारतीचा वरचा मजला अशा तीन ठिकाणी स्वतंत्र बॅचेसमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

         या पहिल्या टप्प्यात एकूण 93 प्रगणक आणि 14 पर्यवेक्षकांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी शिंदे वाडा, गौतम नगर आणि गणेश कॉलनी या भागात प्रत्यक्ष भेट देऊन 'फिल्ड ट्रेनिंग' देण्यात आले. यामध्ये मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणे, प्रगणक गटाच्या चतुर सीमा निश्चित करणे आणि संपूर्ण गटाचा नकाशा अचूकपणे रेखाटणे याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

         याकामी फिल्ड ट्रेनर जोगेश शेलार, उपप्राचार्य प्रताप विद्या मंदिर चोपडा, आशिष बडगुजर उपशिक्षक, कै ही. मो. करोडपती हायस्कूल, असलम शेख मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल आणि तळेले सर धरणगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींची गूगल फॉर्म च्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांनी सेवाभावाची व गोपनीयतेची प्रतिज्ञा घेतली. प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना त्यांच्या प्रगणक गटाचे नकाशे, अधिकृत आदेश आणि ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.  प्रशिक्षणार्थींनी या तीन दिवसांत मिळालेल्या प्रशिक्षण व तांत्रिक माहिती बद्दल समाधान व्यक्त केले.
           शिबिराच्या समारोप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चार्ज ऑफिसर रामनिवास झंवर यांनी जनगणनेच्या कामाचे राष्ट्रीय महत्त्व आणि गांभीर्य अधोरेखित केले. ते म्हणाले की, "जे प्रगणक व पर्यवेक्षक उत्कृष्ट काम करतील, त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. विशेषतः ज्यांच्या भागात नागरिकांकडून 'स्व-गणना' (Self-Enumeration) करण्याचे प्रमाण सर्वाधिक असेल, अशा प्रगणकांना विशेष बहुमान दिला जाईल.

         चोपडा न. पा. चे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी शहरवासीयांना आवाहन केले की, 1 मे ते 14 मे 2026 या कालावधीत होणाऱ्या 'स्व-गणना' मोहिमेत नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती नोंदवावी. डिजिटल पद्धतीचा वापर करून घरबसल्या माहिती भरल्यास जनगणनेचे काम अधिक अचूक आणि जलद होण्यास मदत होईल. तसेच 15 मे पासून जेव्हा प्रगणक आपल्या घरी माहिती घेण्यासाठी येतील, तेव्हा त्यांना सन्मानाने घरात प्रवेश द्या आणि विचारलेली माहिती अधिकृतपणे व अचूक द्या. प्रगणक हे राष्ट्रीय कार्यासाठी आपल्या दारी येत आहेत, त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. चोपडा शहराच्या भविष्यातील विकासात प्रत्येकाने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे." प्रगणकांचा करा सन्मान, शहराच्या विकासात द्या योगदान "

        पुढील टप्प्यात उर्वरित 7 पर्यवेक्षक आणि 43 प्रगणक यांचे प्रशिक्षण 27 एप्रिल ते 29 एप्रिल या दरम्यान पार पडणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp