आनंदी व सुखी जीवनासाठी, सकारात्मक विचारसरणी ठेवली तर अनेक आजारांपासून दूर राहता येते - डॉ. मिलिंद सरदार यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/04/2026

आनंदी व सुखी जीवनासाठी, सकारात्मक विचारसरणी ठेवली तर अनेक आजारांपासून दूर राहता येते - डॉ. मिलिंद सरदार यांचे प्रतिपादन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          आनंदी व सुखी जीवनासाठी, सकारात्मक विचारसरणी ठेवली तर अनेक आजारांपासून दूर राहता येते - डॉ. मिलिंद सरदार यांचे प्रतिपादन

          पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वाढदिवसा निमित्त पंकज बालसंस्कार केंद्र, चोपडा येथे डॉ. मिलिंद सरदार (समन्वयक, माधवबाग आरोग्य संस्था, पुणे) यांचे प्रेरणादायी व मार्गदर्शक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील विचारवंत, नामवंत व्यक्ती, बुद्धिजीवी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या व्याख्यानात डॉ. सरदार यांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवत आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्याचे सोपे पण प्रभावी मंत्र दिले. “मीच माझ्या आनंदी व सुखी जीवनाचा शिल्पकार आहे” या संकल्पनेवर त्यांनी विशेष भर देत, सकारात्मक विचारसरणी ठेवली तर अनेक आजारांपासून दूर राहता येते, असे प्रतिपादन केले.
          यावेळी त्यांनी मधुमेह (Diabetes) या वाढत्या आजाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अतिस्थूलता, उच्च रक्तदाब आणि ताणतणाव ही मधुमेहाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी सांगितले. आहारविषयक मार्गदर्शन करताना त्यांनी सात्त्विक अन्न, साखरेचे कमी सेवन, मैदा व पॅकबंद खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला. तसेच योग, प्राणायाम आणि आयुर्वेद यांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास शरीर आणि मन निरोगी राहते, असे त्यांनी नमूद केले.

         “आपण स्वतःच आपले डॉक्टर आहोत. स्वतःची योग्य काळजी घेतली, तर डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही,” असा मोलाचा संदेश देत त्यांनी ‘इगो’ (अहंकार) दूर ठेवण्याचाही सल्ला दिला. सदर व्याख्यानातून उपस्थितांना आरोग्य, जीवनशैली आणि मानसिक संतुलन याबाबत बहुमोल मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल उपस्थितांनी संस्थेचे विशेष कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp