Post Top Ad
Responsive Ads Here
25/05/2026
Home
Unlabelled
जनगणना 2027 अंतर्गत चोपडा शहरातील घरगणना पहिला टप्पा उत्साहात सुरू...
जनगणना 2027 अंतर्गत चोपडा शहरातील घरगणना पहिला टप्पा उत्साहात सुरू...
चार्ज अधिकारी रामनिवास झंवर यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, “चोपडा शहरातील एकही इमारत, घर किंवा कुटुंब जनगणनेतून सुटता कामा नये. प्रत्येक नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात शासन नागरिकांसाठी कोणत्या योजना राबवेल, निधीचे नियोजन कसे होईल, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, निवास व्यवस्था आदी सर्व प्रकारचे नियोजन हे जनगणनेतील आकडेवारीवर आधारित असते. त्यामुळे ही केवळ माहिती संकलन प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “चोपडा शहरातील सर्व प्रगणक व पर्यवेक्षक अत्यंत उत्साहाने, एकजुटीने व जबाबदारीने काम करत आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करत प्रत्येक भागात माहिती संकलनाचे कार्य वेगाने सुरू आहे. येत्या 2 जून 2026 पर्यंत शहरातील घरगणना पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.” बैठकीत सर्व पर्यवेक्षकांना आपल्या क्षेत्रातील उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच माहिती संकलन करताना अचूकता, शिस्त व नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चोपडा शहरातील नागरिकांनी जनगणना कार्यास सहकार्य करून माहिती अचूकपणे द्यावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment