उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश ; अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ करावी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/05/2026

उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश ; अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ करावी

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रशासनाला निर्देश ; अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ करावी

         महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील दिनांक 1 जानेवारी 2011 पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याबाबत उपविभागीय अधिकारी अमळनेर, मयुर भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली  आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात व चोपडा नगरपरिषद मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्यासह नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते. 

         या बैठकीत चोपडा शहरातील विविध भागांमधील शासकीय जमिनी, त्यावरील निवासी अतिक्रमणांची स्थिती व आरक्षणे तसेच शासन निर्णयानुसार पात्रतेच्या अटी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरण प्रक्रियेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतिमान करण्या बाबत सूचना देण्यात आल्या. नागरिकांमध्ये योजनेबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शहरातील विविध प्रमुख ठिकाणी माहितीपर बॅनर लावणे तसेच घंटागाडी व इतर प्रसार माध्यमांद्वारे प्रचार करण्याची सूचना करण्यात आली. संबंधित नागरिकांना अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तात्काळ अर्ज वितरण सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली.
          तसेच नागरिकांना आवश्यक मार्गदर्शनासाठी तात्काळ स्वतंत्र मदत कक्ष (Help Desk) सुरू करण्याबाबत आदेशित केल्यानुसार उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या उपस्थितीत 'अतिक्रमण नियमानुकूल मदत कक्ष' कार्यान्वित करण्यात आला. मदत कक्षामार्फत नागरिकांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती, पात्रतेच्या अटी तसेच प्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
          यावेळी काही नागरिक अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत चौकशी करिता आले असता उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या हस्ते त्यांना अर्ज वितरीत करण्यात येऊन सदर अर्ज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचे सूचित करण्यात आले. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावेत, अर्ज सादर करतांना येणाऱ्या अडचणी निराकरण करणेकामी मदत कक्षाची मदत घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याकडून करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp