संदीप गायकवाड यांची जळगाव ते पंढरपूर 485 किलोमीटर सायकल वारी..... - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

27/07/2026

संदीप गायकवाड यांची जळगाव ते पंढरपूर 485 किलोमीटर सायकल वारी.....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

        संदीप गायकवाड यांची जळगाव ते पंढरपूर 485 किलोमीटर सायकल वारी.....

         चोपडा नगरपरिषदेचे कर अधिकारी संदीप गायकवाड यांनी जळगाव ते पंढरपूर हा सुमारे 485 किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून विठ्ठल भक्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा नगरपरिषधेत सत्कार करण्यात आला.

        या प्रसंगी माननीय नगराध्यक्ष सौ. नम्रता सचिन पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोलले तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांच्या हस्ते संदीप गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

          यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप गायकवाड यांच्या जिद्द, चिकाटी व साहसी वृत्तीचे कौतुक केले. जळगाव ते पंढरपूर हा 485 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करणे ही मोठी आणि प्रेरणादायी कामगिरी असून युवकांनीही आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शिस्तीचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार, नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संदीप गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

          याप्रसंगी उपमुख्य अधिकारी - संजय मिसर, नगर अभियंता - डीगंबर वाघ, पाणीपुरवठा अभियंता - जितेंद्र मोरे, विद्युत अभियंता - प्रमोद पाटील, लेखपाल - मयूर शर्मा, लेखा परीक्षक - चेतन गडकर, कर निरीक्षक - प्रणव पाटील, स्वच्छता निरीक्षक - वसंत राठोड, दिपाली साळुंखे, जयेश भोंगे, भांडारपाल - महेश जोशी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp