चोपडा नगरपरिषदेचा उपक्रम ; शहर स्वच्छतेचा श्रमदानातून निर्धार... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

09/07/2026

चोपडा नगरपरिषदेचा उपक्रम ; शहर स्वच्छतेचा श्रमदानातून निर्धार...

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         चोपडा नगरपरिषदेचा उपक्रम ; शहर स्वच्छतेचा श्रमदानातून निर्धार...

        चोपडा, दि. 09 जुलै 2026 : स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत चोपडा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत शहरातील गटारींची सर्वंकष साफसफाई करण्याच्या उद्देशाने "स्वच्छ श्रमदान मोहीम" राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे शहरातील सर्व गटारी स्वच्छ करून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा तसेच शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी राहावे, हा नगरपरिषदेचा मानस आहे. सदर श्रमदान मोहिमेची सुरुवात शेतपुरा, केजीएन कॉलनी आणि मुस्तफा कॉलनी येथून करण्यात आली असून आज, दि. 09 जुलै 2026 रोजी धनवाडी फाटा परिसरातील कॉलनी भागात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

        या प्रसंगी चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, आरोग्य सभापती रमेश शिंदे, मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच नगरसेवक रमाकांत ठाकूर, श्रीमती वंदना पाटील, सैय्यद फरमान अली यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली श्रमदान मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेअंतर्गत बोरोले नगर क्रमांक 1 व 2, पंकज नगर, पवार नगर, मधुबन नगर, चारुशिला नगर आणि शारदा नगर या भागांतील गटारींची साफसफाई करण्यात येत आहे.

        यावेळी नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील व उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कचरा गटारीत टाकू नये. घरातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. गटारींमध्ये कचरा टाकल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा अडतो, गटारी तुंबतात आणि सफाई कर्मचाऱ्यांना गाळ व कचरा काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून नगरपरिषदेला सहकार्य करावे. सदर श्रमदान मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी स्वच्छता निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके व जयेश भोंगे यांनी परिश्रम घेऊन मुकादन यांनी नियोजन करुन श्रमदान मोहिम पार पाडली. 

         चोपडा नगरपरिषदेने नागरिकांना शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता उपक्रमांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp