Post Top Ad
Responsive Ads Here
19/07/2026
Home
Unlabelled
चोपड्यात अतिशय दुर्मिळ व विषारी ‘पोवळा’ सापाचा अनपेक्षित आढळ ; सर्पमित्राच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान ! ! !
चोपड्यात अतिशय दुर्मिळ व विषारी ‘पोवळा’ सापाचा अनपेक्षित आढळ ; सर्पमित्राच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान ! ! !
पोवळा हा साप लाजाळू व निशाचर (रात्री फिरणारा) स्वभावाचा असल्यामुळे तो माणसाला सहसा चावत नाही. याचे विष मज्जासंस्थेवर (Neurotoxic) परिणाम करणारे असले, तरी याच्या दंशामुळे मानवी मृत्यू झाल्याच्या नोंदी अत्यंत दुर्मिळ आहेत. हा साप आकाराने खूप लहान असून त्याची कमाल लांबी ४० सेमी असते. त्याचे शरीर सडपातळ व फिकट तपकिरी रंगाचे असून त्यावर बारीक काळे ठिपके असतात. त्याचे डोके पूर्णपणे काळ्या रंगाचे असते. या सापाची शेपटी निळसर-काळी किंवा गडद काळ्या रंगाची असते. स्वतःचा बचाव करताना किंवा धोका जाणवल्यास तो शेपटी वर करून शत्रूला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. हा साप प्रामुख्याने पानगळीची जंगले, गवताळ प्रदेश आणि दमट भागात पालापाचोळ्याच्या किंवा जमिनीच्या आत दडून राहणे पसंत करतो.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment